मांजरीमध्ये असलेल्या स्मशानभूमीत विकास सोनवणे नावाच्या 32 वर्षीय युवकाचा खून झाला. एकूण पाच जणांनी विकासची हत्या केल्याचा आरोप आहे. हत्येचे कारण समजू शकलेले नाही.

धक्कादायक प्रकार

स्मशानभूमीतच युवकाची हत्या झाल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. पाच जणांनी मिळून तरुणाची निर्घृण हत्या केली.

पुणे जिल्ह्यात लोणीकंद पोलिस ठाण्याच्या हद्दीत मांजरीतील स्मशानभूमीत ही घटना घडली. दोघा आरोपींना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. हत्येचं नेमकं कारण अद्याप अस्पष्ट आहे.

Advertisement

भिवंडीत ओला कार चालकाची हत्या

मुंबई-नाशिक महामार्गावर भिवंडी ठाणे बायपास रस्त्यावरील माणकोली नाका येथे एका कारमध्ये मृतदेह आढळला होता. महामार्गावरील माणकोली परिसरात उड्डाणपुलाच्या खाली उभ्या असलेल्या व्हॅगन आर कारच्या (ओला) ड्रायव्हरचा हा मृतदेह होता.

चालकाची गळा आवळून हत्या केल्याचं तपासादरम्यान समोर आलं. प्रभाकर पांडू गंजी (वय 42 वर्ष) असे त्याचे नाव असून तो पद्मा नगर भिवंडी येथील रहिवासी होता. मृतदेहाच्या गळ्याभोवती आवळल्याचे व्रण दिसल्याने ही हत्या असल्याचे निष्पन्न झाले आहे.

व्यवस्थापक म्हणून नोकरी गेल्यानंतर ड्रायव्हरचे काम

यंत्रमाग कारखान्यात व्यवस्थापक म्हणून काम करत असताना टाळेबंदीमुळे काम बंद झाले. त्यामुळे आर्थिक टंचाईतून सुटका करून घेण्यासाठी त्याने स्वतःच्या व्हॅगन आर कारला ओलामध्ये लावून घेतलं. स्वतःच ड्रायव्हर म्हणून त्याने मागील एक महिन्यापासून काम करण्यास सुरुवात केली होती.

Advertisement