Punelive24.com
Latest News, Videos, Web Stories and Photos from Pune

प्रेयसीचा प्रियकराकडून खून,’तो’ तरुण अटकेत !

प्रेमसंबंध असताना चारित्र्यावर संशय घेऊन प्रियकराने पाेटात चाकू भाेसकून प्रेयसीचा खून केल्याची घटना पुण्यातील भारती विद्यापीठ पाेलिस ठाण्याच्या हद्दीत रविवारी रात्री दहा वाजण्याच्या सुमारास घडली.

सपना दिलीप पाटील (३२, रा. धनकवडी, पुणे) असे खून झालेल्या तरुणीचे नाव आहे. याप्रकरणी तिचा प्रियकर राम गिरी (३५, मु. रा. परभणी) यास पाेलिसांनी अटक केली आहे.

याबाबत भारती विद्यापीठ पाेलिसांकडे संजीवनी दत्ता देवकर (२९) हिने पाेलिसांकडे फिर्याद दिली अाहे. संजीवनी देवकर आणि सपना पाटील या रिलायन्स मार्टमध्ये हाऊस कीपिंगचे काम करत हाेत्या.

तसेच धनकवडीतील बालाजीनगर परिसरात वास्तव्यास आहेत. रविवारी रात्री साडेआठ वाजण्याच्या सुमारास सपना आणि राम गिरी हे जेवणासाठी हाॅटेलमध्ये गेले हाेते.

जेवण केल्यानंतर ते रात्री दहाच्या सुमारास मित्रासह कारने घरी परतताना नवीन कात्रज बाेगद्याच्या सुरुवातीस काेळेवाडी येथे राम गिरी याने

गाडीतच पाठीमागील बाजूला सपनाच्या पाेटात चाकूने भाेसकून तिला गंभीर जखमी केले. त्यानंतर गाडी थांबवून तो पसार झाला. याप्रकरणी पोलिस अधिक तपास करत आहेत.

राम गिरी याच्या मित्राने सपना हिला तातडीने रुग्णालयात नेले असता उपचारापूर्वीच तिचा मृत्यू झाला. दरम्यान, आरोपीनेही याबाबतची कबुली सपना हिच्या बहिणीस फोन करून दिली.

खुनाची माहिती मिळताच पोलिसांनी त्याला अटक केली. आरोपी राम गिरी हा हॉटेलमध्ये कुकिंग आणि हाऊस कीपिंगचे काम करत होता.

सपनासोबत मागील पाच ते सहा वर्षांपासून त्याचे प्रेमसंबंध असल्याचे सांगण्यात आले.

Leave a comment