file photo

पुणे : काम करीत नसल्याची तक्रार आई कायम वडीलांकडे करीत असल्याच्या रागातून १७ वर्षांच्या सावत्र मुलाने आईची धारदार कोयत्याने हत्या केली. तळेगाव दाभाडे येथे ही घटना घडली.

हे आहे आईचे नाव

पुणे जिल्ह्यातील तळेगाव दाभाडे भागात मध्यरात्री हत्येचा थरार घडला. 17 वर्षीय अल्पवयीन मुलाने आपल्या सावत्र आईची हत्या केली.

मुलाने धारदार कोयत्याने महिलेवर हल्ला केला. रेखा वाघमारे असं मयत सावत्र आईचे नाव आहे. तळेगाव दाभाडे पोलिसांनी 17 वर्षीय अल्पवयीन आरोपीला ताब्यात घेतले आहे.

Advertisement

हत्येचे कारण

17 वर्षांचा मुलगा काहीही काम करत नाही, नुसता फिरत असतो, अशी तक्रार सावत्र आई रेखा वाघमारे सतत आपल्या पतीकडे करत असायच्या. या कारणावरुन झालेल्या वादानंतर मुलाने तिची हत्या केल्याचा आरोप आहे.

प्रेमसंबंधात अडथळा, आईची हत्या

दुसरीकडे, प्रेमसंबंधात अडसर ठरणाऱ्या सख्ख्या आईची 19 वर्षीय तरुणाने हत्या केल्याचा प्रकार काही महिन्यांपूर्वी पुण्यातच घडला होता. हत्येसाठी तरुणाच्या 26 वर्षीय प्रेयसीनेही त्याला साथ दिल्याचा आरोप झाला.

त्यानंतर पोलिसांनी प्रेमी युगुलाला बेड्या ठोकल्या. मायलेकाच्या नात्याला काळिमा फासणाऱ्या या घटनेने पुण्यात एकच खळबळ उडाली होती.

Advertisement