Punelive24.com
Latest News, Videos, Web Stories and Photos from Pune

प्रेयसी म्हणाली मला तुझी गरज नाही, तू मरून जा..आणि त्याने फेसबुक लाइव्ह करत संपवलं जीवन

प्रेमी जोडप्यात किरकोळ कारणातून वाद झाला. रागाच्या भरात प्रेयसीनं मला तुझी गरज नाही, तू मरून जा… असे उद्भार निघाले आणि मुंबईत एका तरुणानं खरोखर आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे.

अधिक धक्कादायक बाब म्हणजे तरुणानं फेसबुक लाइव्ह करत आपली जीवन संपवलं.अंकुश नामदेव पवार असं आत्महत्या करणाऱ्या 27 वर्षीय तरुणाचं नाव आहे.

तो मुळ जालना जिल्ह्यातील भोकरदन तालुक्याच्या पिंपळगाव रेणुकाई येथील रहिवासी आहे. या प्रकरणात प्रेयसीनं छळामुळेच तरुणानं आत्महत्या केल्याचा आरोप नातेवाईकांनी केला असून याप्रकरणाचा तपास सुरू आहे.

Advertisement

अंकुश हा चार वर्षांपूर्वी कामाच्या शोधात मुंबईला आला होता. येथे कल्याण येथील एका खाजगी रुग्णालयात नोकरी करत होता.

दरम्यान त्याची ओळख एका घटस्फोट झालेल्या तरुणीशी झाली आणि कालांतराने त्यांच्या ओळखीचं रुपांतर प्रेमात झालं. दोघं एकमेकांशी लग्नही करणार होते.

भविष्यासाठी त्याने मुलीकडे सेव्हिंग करण्यासाठी काही पैसेही देत होतात. पण ते पैसे प्रेयसी मौज करण्यासाठी उडवत असल्याची माहिती अंकुशला मिळाली. यामुळे दोघांत खटके उडू लागले.

Advertisement

त्यांच्या वाद घडला आणि तिने प्रेयसीचं वागणं जिव्हारी लागल्यानं मरुन जाण्याची धमकी दिली. तेव्हा प्रेयसीनं देखील तू मरून जा, मला तुझी गरज नाही असं सुनावलं.

प्रेयसीसोबत वाद झाल्यानंतर अंकुशनं फेसबुक लाइव्ह करत आत्महत्या केली आहे. आत्महत्या करण्यापूर्वी त्यानं वेळोवेळी त्यासोबत विश्वासघात झाल्याचं म्हटलं.

 

Advertisement
Leave a comment