Punelive24.com
Latest News, Videos, Web Stories and Photos from Pune

नॅकचे मूल्यांकन शुल्क एक लाख रुपयांनी कमी

राष्ट्रीय मूल्यांकन व अधिस्वीकृती परिषदेची (नॅक) वरिष्ठ महाविद्यालयांसाठीचे मूल्यांकन शुल्क कमी करण्यासाठी उच्च व तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत यांनी देपाठपुरावा केला.

त्यामुळे शैक्षणिक संस्था, वरिष्ठ महाविद्यालये, विद्यापीठे यांच्या मूल्यांकन प्रक्रियेसाठी ‘नॅक’कडून आकारण्यात येणारे शुल्क तब्बल एक लाख रुपयांनी कमी करण्यात आले आहे.

नॅकचे शुल्क वेगवेगळे

देशातील वरिष्ठ महाविद्यालये, शैक्षणिक संस्था आणि विद्यापीठांची शैक्षणिक, संशोधनात्मक, प्रशासकीय आणि संरचनात्मक गुणवत्ता ‘नॅक’मार्फत दर पाच वर्षांनी विविध निकषांच्या आधारे तपासली जाते.

Advertisement

या तपासणीतून प्राप्त निष्कर्षांच्या आधारे महाविद्यालयांचे मानांकन ठरवले जाते. या मूल्यांकन प्रक्रियेसाठी नॅककडून महाविद्यालय व संस्थानिहाय वेगवेगळे शुल्क आकारले जाते.

शैक्षणिक संस्थांना दिलासा

आतापर्यंत ‘नॅक’ मूल्याकंनाचे एकूण शुल्क हे सव्वा चार लाख रुपयांच्या आसपास होते; परंतु आता हे शुल्क एक लाख तीनशे रुपयांनी कमी झाले आहे.

त्यामुळे आता वरिष्ठ महाविद्यालयांना एकूण तीन लाख २४ हजार ५०० रुपये शुल्क द्यावे लागणार आहे, अशी माहिती उच्च शिक्षण संचालक डॉ. धनराज माने यांनी दिली.

Advertisement

त्यामुळे जास्त शुल्क असल्याने आतापर्यंत या प्रक्रियेत सहभागी होऊ न शकलेल्या ग्रामीण आणि आदिवासी भागातील छोट्या महाविद्यालयांना, शैक्षणिक संस्थांना दिलासा मिळाला आहे.

१४ विद्यापीठांचे नॅक मानांकन

राज्यातील १५ अकृषी विद्यापीठांपैकी १४ विद्यापीठांचे नॅक मानांकन झालेले आहे. उर्वरित गडचिरोली येथील गोंडवाना विद्यापीठ आता मूल्यांकनासाठी आता पात्र झाले आहे.

दहा अकृषी विद्यापीठे नॅक पुनर्मूल्यांकन व मानांकन प्रक्रियेत सहभागी झाले आहेत. ‘नॅक’तर्फे शुल्क कमी झाल्यामुळे राज्यातील सर्व महाविद्यालयांनी या मूल्यांकन प्रक्रियेत सहभागी व्हावे, असे आवाहन डॉ. माने यांनी केले आहे.

Advertisement
Leave a comment