पुणे : उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांनी बारामतीमध्ये (Baramati) पत्रकारांशी संवाद साधला. त्यावेळी त्यांनी नगरपंचायत निवडणूक निकालानंतर (Nagar Panchayat Election result) पहिली प्रतिक्रिया (Feedback) दिली आहे. निवडून आलेल्या उमेदवारांचे अजित पवार यांनी अभिनंदन केले आहे.

माध्यमांशी बोलताना अजित पवार म्हणाले, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (CM Uddhav Thackeray) यांनी राष्ट्रवादी, काँग्रेस व शिवसेनेच्या (Shivsena) नेत्यांना नेहमी सांगत होते की, आपण अशा निवडणुकांना तिन्ही पक्ष एकत्र सामोरे जाऊ.

पण कोरोना निर्बंध आणि स्थानिक राजकिय मुद्द्यांमुळे ते शक्य झाले नाही. स्थानिक निवडणुकांमध्ये तेथील परिस्थितीनुसार मतदान होते. मात्र या निवडणुका पक्षांच्या चिन्हावर झाल्या आहेत.

Advertisement

जे निवडून आले त्यांचे मनापासून अभिनंदन करतो. नगरसेवकांना शहराच्या विकासासाठी राज्यसरकारकडून संपूर्ण सहकार्य केले जाईल, अशी प्रतिक्रिया उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिली आहे.

पुढे बोलताना पवार म्हणाले, खरे तर महाविकास आघाडीचे (Mahavikas Aghadi) सरकार आल्यानंतर आम्ही तिन्ही पक्षांनी कोणत्याही ठिकाणी महाविकास आघाडीचे उमेदवार दिले नाहीत.

चारही पक्ष आपले जास्तित जास्त उमेदवार निवडूण यावेत असे प्रयत्न होते. तिनही पक्षांनी स्थानिक पदाधिकाऱ्यांना जिल्हा पातळीवर कोणासोबत आघाडी करायची का स्वतंत्र लढायचे असे निर्णय घेण्याची मुभा दिली होती, असेही अजित पवारांनी सांगितले आहे.

Advertisement