पुणे : महाराष्ट्रातील (Maharashtra) 106 नगरपंचायतीच्या निवडणूका (Nagar panchayt Election) पार पडल्या होत्या. या निवडणुकीची प्रक्रिया 2 टप्प्यात पार पडली होती. यातच राष्ट्रवादी काँग्रेसने (NCP) कर्जत (Karjat) मध्ये एकहाती सत्ता मिळवली आहे.

कर्जत नगरपंचायतीत 17 जागांसाठी नगरपंचायतीची निवडणूक पार पडली होती. यामध्ये 17 पैकी 12 जागा जिंकत राष्ट्रवादी काँग्रेसने राम शिंदे (Ram Shinde) यांना मोठा धक्का देत वर्चस्व निर्माण केले आहे.

भाजपचे (BJP) राम शिंदे आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार रोहित पवार (Rohit Pawar) यांच्यात नगरपंचायतीच्या निवडणुकीसाठी जोरदार लढत असल्याचे बोलले जात होते. यामध्ये रोहित पवार यांनी गड जिंकल्याचे पाहायला मिळाले आहे.

Advertisement

नगरपंचायत निवडणूक निकालानंतर (Nagar Panchayat Election Result) आमदार रोहित पवार (MLA Rohit Pawar) यांनी पहिली प्रतिक्रिया दिली आहे.

राष्ट्रवादी काँग्रेस (NCP) व काँग्रेसने (Congress) एकत्र ही निवडणूक लढवली होती. विकासाच्या मुद्द्यावर ही निवडणूक झाली.

कर्जत शहरात (Karjat City) लोकांमध्ये जाऊन लोकांचे विषय समजून घेऊन आम्ही ही निवडणूक लढवली त्याला कर्जत शहरातील नागरिकांनी देखील प्रतिसाद दिला, अशी प्रतिक्रिया रोहित पवार यांनी दिली आहे.

Advertisement