मुंबई : महाराष्ट्रातील (Maharashtra) 106 नगरपंचायतीच्या निवडणूका (Nagarpanchayt Election) पार पडल्या होत्या. या निवडणुकीची प्रक्रिया 2 टप्प्यात पार पडली होती. यातच राष्ट्रवादी काँग्रेसने (NCP) कर्जत (Karjat) मध्ये एकहाती सत्ता मिळवली आहे.

राष्ट्रवादी काँग्रेसने (NCP) नगर पंचायत निवडणुकीत (Nagar Panchayat Election) विजयाचे खाते उघडले आहे. तसेच राष्ट्रवादी काँग्रेसचे विजयाचे सत्र सध्या सुरूच असल्याचे पाहायला मिळत आहे.

राष्ट्रवादी काँग्रेसचे कर्जत जामखेड मतदार संघाचे आमदार रोहित पवार (Rohit Pawar) यांच्या मतदार संघात राष्ट्रवादी काँग्रेसने एकहाती सत्ता मिळवली आहे. कर्जत नगरपंचायतीत एकहाती सत्ता मिळवत राष्ट्रवादी काँग्रेसने वर्चस्व निर्माण केले आहे.

Advertisement

कर्जत नगरपंचायतीत 17 जागांसाठी नगरपंचायतीची निवडणूक पार पडली होती. यामध्ये 17 पैकी 12 जागा जिंकत राष्ट्रवादी काँग्रेसने राम शिंदे (Ram Shinde) यांना मोठा धक्का देत वर्चस्व निर्माण केले आहे.

भाजपचे (BJP) राम शिंदे आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार रोहित पवार यांच्यात नगरपंचायतीच्या निवडणुकीसाठी जोरदार लढत असल्याचे बोलले जात होते. यामध्ये रोहित पवार यांनी गड जिंकल्याचे पाहायला मिळाले आहे.

कळवण (Kalwan) नगरपंचायतीत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने विजयाचा दरवाजा उघडला आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे कौतिक पगार (Kautik Pagar) हे कळवण नगरपंचायतीत विजयी झाले आहेत.

Advertisement

कळवण नागरपंचायतीमधील (Kalawan Nagarpanchayat) प्रभाग क्रमांक 1 मधून कौतिक पगार हे विजयी झाले आहेत. कौतिक पगार यांनी 545 मते मिळवून विजयाचा बार उडवला आहे.