file photo

पुणे : राष्ट्रवादी काँग्रेसने (NCP) नगर पंचायत निवडणुकीत (Nagar Panchayat Election) विजयाचे खाते उघडले आहे. राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांकडून जल्लोष साजरा केला जात आहे. या निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसने आघाडी घेतल्याचे दिसून येत आहे.

राज्यातील 106 नगरपंचायतीच्या निवडणूक (Election) पार पडल्या होत्या. या निवडणुकीची प्रक्रिया 2 टप्प्यात पार पडली होती. यामध्ये सध्यातरी राष्ट्रवादी काँग्रेसने मुसंडी मारल्याचे चित्र दिसत आहे.

कळवण (Kalawan) नगरपंचायतीत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने विजयाचा दरवाजा उघडला आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे कौतिक पगार (Kautik Pagar) हे कळवण नगरपंचायतीत विजयी झाले आहेत.

Advertisement

कळवण नागरपंचायतीमधील (Kalawan Nagarpanchayat) प्रभाग क्रमांक 1 मधून कौतिक पगार हे विजयी झाले आहेत. कौतिक पगार यांनी 545 मते मिळवून विजयाचा बार उडवला आहे.

तीर्थपुरीमध्ये (Tirthpuri) ऐकून 17 जागांसाठी निवडणूक पार पडली आहे. आतापर्यंत आलेल्या निकालानुसार भाजप 1, शिवसेना 1, काँग्रेस 0 आणि राष्ट्रवादी काँग्रेस 4 जागा जिंकल्या आहेत.

तसेच चंद्रपूर (Chandrapur) जिल्ह्यातील ऐकून 6 नगरपंचायतीच्या 102 जागांसाठी निवडणूक प्रक्रिया पार पडली आहे. यामध्ये भाजप 3, शिवसेना 1, काँग्रेस 3 आणि राष्ट्रवादी काँग्रेसने अजूनही या नगरपंचायतीमध्ये खाते उघडलेले नाही.

Advertisement