ahmednagarlive24
Breaking News Updates Of Ahmednagar

नाैदलाला अगोदरच ड्रोन हल्ल्याची सूचना

मुंबईः पाकिस्तानच्या सीमेपासून अवघ्या १४ किलोमीटरवर असलेल्या जम्मू येथील भारतीय हवाई दलाच्या तळावर ड्रोन हल्ला झाल्याचे उघडकीस आले; मात्र मुंबईतील नाैदालाने अगोदरच सावधानता म्हणून ड्रोन उड्डाणाला मज्जाव केला आहे.

निर्बंध ठरले योग्य

नौदलाच्या मालाड येथील तळाला ड्रोनसंबंधी नौदलाने याआधीच सूचना दिली होती. त्यानुसार मागील आठवड्यापासूनच त्या परिसरात ड्रोन उड्डाणाला नौदलाने मज्जाव केला आहे. जम्मूतील ड्रोनहल्ल्यानंतर नौदलाचे हे निर्बंध योग्य ठरल्याचे अधोरेखित झाले आहे.

अचानक ड्रोनला बंदी का?

नौदलाच्या पश्चिम कमांडचे मुख्यालय मुंबईत आहे. मुंबईतील मालाड येथील मार्वे किनाऱ्याजवळ नौदलाचे नाविक प्रशिक्षण केंद्र व तळ आहे.

या तळापासून तीन किलोमीटरच्या परिसरात कुठल्याही प्रकारच्या ड्रोनचा विना परवानगी वापर करण्यावर नौदलाने निर्बंध आणले होते.

मागील आठवड्यातच असे निर्बंध आणले गेले. त्या वेळी अचानक असे निर्बंध का?, असा प्रश्न उपस्थित झाला होता; मात्र आता जम्मूच्या हवाईतळावरील ड्रोनहल्ल्यानंतर हे निर्बंध योग्य ठरले आहेत.

महत्त्वाच्या केंद्राच्या सुरक्षेचा मुद्दा ऐरणीवर

मुंबईत मालाडखेरीज अन्यत्रदेखील संरक्षण दलांचे महत्त्वाचे तळ आहेत. कुलाब्यातील लष्करी तळ, नौदलाचे रुग्णालय, भूदलाचे महाराष्ट्र,

गुजरात व गोवा क्षेत्र मुख्यालय, नौदल गोदीसह पश्चिम कमांडचे मुख्यालय, वरळीतील नौदल प्रशिक्षण केंद्र, तटरक्षक दलाचे पश्चिम सागरी क्षेत्र मुख्यालय ही महत्त्वाची ठिकाणे मुंबईतच आहेत. त्याखेरीज ठाण्यातील हवाईतळ,

कान्हेरी टेकड्यांवर हवाईदलाचे रडार स्टेशन आदीदेखील मुंबई परिसरातच आहे. जम्मूतील घटनेनंतर या सर्व ठिकाणांच्या सुरक्षेचा प्रश्न आता महत्त्वाचा ठरत आहे.

या सर्व ठिकाणांजवळ कुठल्याही प्रकारचे टोलेजंग बांधकाम करण्यावर नौदल तसेच सुरक्षा दलांनी बंधने आणली आहेत. जम्मूतील ड्रोनहल्ल्यानंतर सुरक्षेचा मुद्दा आता चिंताजनक ठरत आहे.

अन्य तळांजवळही ड्रोनबंदी?

कुलाब्यातील नौदल गोदी, पश्चिम कमांड मुख्यालय, लष्करी तळ हा भाग सुरक्षेच्या दृष्टीने संवेदनशील आहे.

त्यामुळे तेथे ड्रोनउड्डाणाला आधीपासून मज्जाव आहे. अन्य भागातदेखील पोलिसांच्या परवानगीखेरीज ड्रोनचे उड्डाण करता येत नाही, असे नौदल सूत्रांनी सांगितले.

आता जम्मूतील घटनेनंतर देशाच्या आर्थिक राजधानीतील सर्वच लष्करी तळांच्या परिसरात अशाप्रकारच्या ड्रोन उड्डाणाला मज्जाव केला जाण्याची शक्यता आहे.

तूर्तास नौदल किंवा संरक्षण विभागाकडून यासंदर्भात कुठल्याही सूचना आलेल्या नाहीत; मात्र लवकरच याबाबत निर्णय होऊ शकतो, असेही सूत्रांचे म्हणणे आहे.

You might also like
2 li