केंद्र सरकारची एक देश, एक रेशन कार्ड ही योजना तातडीने राबविण्याचे आदेश सर्वोच्च न्यायालयाने दिले आहेत. त्यामुळे आता महाराष्ट्राची ओळख असलेले महाराष्ट्र शासन हे शब्द आणि राज्याचा शिक्का जाणार का, असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.

काय म्हटलं आहे शिदोरेंनी ?

मनसेचे नेते अनिल शिदोरे यांनी ‘वन नेशन, वन रेशन कार्ड’ च्या अनुषंगानं एक ट्वीट केलं आहे. ‘एक देश, एक रेशनकार्ड’ आलं म्हणजे रेशन-कार्डावरचे ‘महाराष्ट्र शासन’ हे शब्द जाणार का? असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला आहे.

‘हे शब्द गेले, तर त्यात विशेष काय असं एखाद्याला वाटेल; पण, तसं पाहिलं तर त्यामुळं हळूहळू जनातलं, मनातलं ‘महाराष्ट्र’ हे नाव पुसलं जाऊ शकतं. आपल्या अस्मितेचा, स्वाभिमानाचा कस कसा आहे यावर हे वाटणं, न वाटणं अवलंबून आहे, असं शिदोरे यांनी म्हटलं आहे.

Advertisement

वेगवेगळ्या प्रतिक्रिया

शिदोरे यांच्या ट्वीटवर वेगवेगळ्या प्रतिक्रिया आल्या आहेत. ‘सगळीकडंच हिंदी लादली जात आहे, देशाची संघराज्य ही ओळख पुसण्याचा प्रयत्न होत आहे, असा संताप काहींनी व्यक्त केला आहे, तर हा निर्णय मुख्यत: स्थलांतरित कामगारांना रेशनवर धान्य घेता यावे म्हणून घेण्यात आला आहे.

त्यांची भूक जास्त महत्त्वाची नाही का? रेशन कार्डावर महाराष्ट्राचं नाव असणं / नसणं हा आपल्या अस्मितेचा मुद्दा खरंच असू शकतो का?,’ असाही प्रश्न काहींनी उपस्थित केला आहे.

 

Advertisement