मुंबई : शिवसेना (Shivsena) नेते संजय राऊत (Sanjay Raut) यांनी भाजपवर (BJP) केलेल्या टीकेनंतर काँग्रेस (Congress) नेते नाना पटोले (Nana Patole) यांनीही टीका केली आहे. त्यामुळे नव्या वादाला तोंड फुटण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.

संजय राऊत बोलताना म्हणाले होते की, जे वैफल्य ग्रस्त असतात. निराश मनाने राजकारण करतात त्यांच्या नशिबी शेवटपर्यंत निराशाच असते. भाजपने स्वत:च अंधाऱ्या विहिरीत उडी मारली आहे.

त्यांचा पक्ष जागतिक स्तरावरचा पक्ष आहे. उद्या ब्रिटनचा पंतप्रधान त्यांचा माणूस होईल, व्हाईट हाऊसमध्ये त्यांचा पंतप्रधान असेल असे ते सांगू शकतात. पण काही झाले तरी महाराष्ट्रात (Maharashtra) त्यांचा मुख्यमंत्री होणार नाही असा दावा राऊतांनी केला आहे.

Advertisement

पुढे बोलताना राऊत म्हणाले होते की, महाराष्ट्रात पुढचे २५ – ३०वर्ष तरी त्यांची सत्ता येणार नाही. तोपर्यंत भाजप राहिल की नाही माहीत नाही, असेही शिवसेना नेते संजय राऊत (sanjay raut) म्हणाले होते.

संजय राऊतांच्या या टीकेनंतर काँग्रेस नेते नाना पटोले यांनीही भाजपला डिवचले आहे. राज्यातच काय देशातही भाजप सत्तेत येणार नाही. असे नाना पाटोळे म्हणाले आहेत.

भाजपला रोखण्यासाठीच महाविकास आघाडी (Mahavikas Aghadi) तयार करण्यात आली होती. आता नगरपंचायत निवडणुका झाल्या. भाजपला सत्तेपासून दूर ठेवण्याचा निर्णय आम्ही घेतला आहे.

Advertisement

राज्यातील जनतेला महाराष्ट्रातील जनतेने कौल दिला आहे. आम्ही जनतेच्या कौलचा आदर केला आहे. आम्ही स्वतंत्र लढलो होतो. त्यामुळे कार्यकर्त्यांना जर त्या पद्धतीने सूचना केल्या तर स्थानिक कार्यकर्ते एकत्र बसून निर्णय घेतील.

सर्व अडचणी दूर होतील. कुठेही गडबड होणार नाही. ज्यांची संख्या जास्त असेल त्यांचा नगराध्यक्ष बसवायचा असा निर्णय आम्ही घेतला आहे. त्यानुसार महाविकास आघाडीचे नेते आणि कार्यकर्ते कामाला लागले आहेत, असेही नाना पटोले म्हणाले आहेत.

Advertisement