मुंबई : पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांनी संसदेत काँग्रेसवर (Congress) टीका केली होती. तसेच महाराष्ट्रातून (Maharashtra) कोरोना (Corona) जास्त पसरला होता असेही मोदी म्हणाले होते. त्यानंतर महाराष्ट्रातील राजकारण चांगलेच तापले होते. काँग्रेसचे नेते नाना पटोले (Nana Patole) यांनी भाजपवर (BJP) हल्लाबोल केला आहे.

मोदींच्या या भाषणानंतर काँग्रेस चांगलेच आक्रमक झाल्याचे पाहायला मिळत आहे. मोदींनी महाराष्ट्राची माफी मागावी अशी भूमिका काँग्रेसन घेतल्यामुळे भाजपची चांगलीच कोंडी झाली आहे.

काँग्रेस नेते नाना पटोले बोलताना म्हणाले की, भारतीय जनता पक्षाचा खरा चेहरा आता समोर येतोय. कारण भाजपचे नेते चुकीच्या वक्तव्यांचे समर्थन करत आहेत. मोदींनी माफी मागावी, एवढी आमची भूमिका आहे.

Advertisement

आम्ही हिसेंचे समर्थन करतोय, असे तर काहीच नाही. भाजपचा महाराष्ट्रद्रोही चेहरा आता जनतेसमोर आला आहे. आम्ही शांततेच्या मार्गाने आंदोलन करणार आहोत, असे म्हणत त्यांनी भाजपला इशारा दिला आहे.

पुढे बोलताना ते म्हणाले, प्रसाद लाड तुम्ही काल जे बोललात, ते सगळ्या महाराष्ट्राने ऐकले आहे. त्यामुळे तुमचे विचार काय, हे महाराष्ट्रात कळून चुकले आहे. आता आम्ही अण्णा हजारे साहेबांबाबत एकही शब्द बोलणार नाही.

एखाद्या आईवर शंका घ्यायलाही हे लोक मागेपुढे पाहणार नाहीत. आता काहीही होवो. मोदींनी माफी मागितल्याशिवाय काँग्रेस शांत बसणार नाही. आम्ही आंदोलनाचा आव आणत नाही आहोत.

Advertisement

देश विकणारे सरकार दिल्लीत (Delhi) बसले आहेत. त्या सरकारला आमचा आवाज गेला पाहिजे. महाराष्ट्राचा अवमान करणाऱ्यांनी माफी मागितलीच पाहिजे, अअशी भूमिका नाना पटोले यांनी घेतलेली दिसत आहे.