मुंबई : काँग्रेसचे (Congress) नेते राहुल गांधी (Rahul Gandhi) यांच्याबद्दल आसामचे (Asam) मुख्यमंत्री हेमंत बिस्वा शर्मा (Chief Minister Hemant Biswa Sharma) यांनी खालच्या पातळीवर येऊन टीका केली होती. त्यावरून काँग्रेसचे नेते नाना पटोले (Nana Patole) चांगलेच संतापले आहे.

मुख्यमंत्री हेमंत बिस्वा शर्मा यांनी एका प्रचारसभेत राहुल गांधी यांच्यावर टीका केली होती. त्यांनतर महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष नाना पटोले यांनी जोरदार निशाणा साधला आहे.

नाना पटोले म्हणाले, आसामचे मुख्यमंत्री हेमंत बिस्वा शर्मा यांनी एका प्रचारसभेत काँग्रेस नेते व खासदार राहुल गांधी यांच्याबद्दल अत्यंत खालच्या पातळीवर येऊन केलेले वक्तव्य हे भाजप (BJP) व राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे त्यांच्यावरील संस्कार दर्शवतात.

Advertisement

बिस्वा शर्मा यांचे वक्तव्य पाहता त्यांचे मानसिक संतुलन बिघडल्याचे दिसत असून त्यांनी चांगल्या रुग्णालयात उपचार घेण्याची गरज आहे असे म्हणत नाना पटोले यांनी टीका केली आहे.

पुढे बोलताना पटोले म्हणाले की, बिस्वा शर्मा यांचे वक्तव्य अत्यंत अश्लाघ्य व सर्व मर्यादा पार करणारे आहे. राहुल गांधी यांच्याबद्दल त्यांनी केलेलं वक्तव्य हे त्यांची पातळी दाखवून देणारे आहे.

भाजपातील वरिष्ठ नेत्यांपासून अनेक नेत्यांना विरोधकांवर अशी वैयक्तिक टीका करुन त्यांचे चारित्र्यहनन करण्याचा रोग जडला आहे.

Advertisement

काँग्रेसच्या राष्ट्रीय अध्यक्ष सोनिया गांधी, प्रियंका गांधी, माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंह यांच्याबद्दलही हीन दर्जाचा शब्दप्रयोग भाजपा नेत्यांनी वारंवार केला आहे.

त्यांची हीच संस्कृती आहे असे नाना पटोले म्हणाले आहेत. लोकशाहीमध्ये सरकारला जाब विचारण्याचा अधिकार विरोधी पक्षाला आहे त्यामुळे एक जबाबदार विरोधीपक्ष या नात्याने राहुल गांधी यांनी सरकारला जाब विचारला.

भाजपाने त्यावर आकांडतांडव करण्याची काही गरज नाही परंतु भाजपा हा लोकशाही व संविधानाला मानत नाही. भाजपाचे नेते हीन पातळीवरून विरोधकांना बदनाम करण्याचे काम करत असतात असे म्हणत नाना पटोलेंनी भाजपवरही निशाणा साधला आहे.

Advertisement