प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी भाजपवर जोरदार टीका केली आहे. भाजपची सत्ता पहाटे गेल्यामुळे भाजप पाण्यात माशासारखे तडपडत आहेत.

तसेच राज्यातील सत्ता बरखास्त करण्यापेक्षा केंद्रातली सत्ता बरखास्त करा, असा निशाणा साधत टीका केली आहे. पंतप्रधान यांच्यावर पटोले यांनी वक्तव्य केल होत. त्यावर राजकारणात जोरदार चर्चा रंगली होती.

पटोले यांना त्या वक्तव्यावर प्रश्न विचारले जात आहेत. त्यावर मी बोलणार नाही. गुंडाची चर्चा त्या प्रवृत्तीचे लोक करतात. मी ज्या गावगुंडाबाबत बोललो होतो. तो सर्वांसमोर आला आहे.

आता या विषयावर मी बोलणार नाही, असं पटोले यांनी सांगितले आहे. पटोले म्हणाले, जीवे मारण्याची भाषा मी केली नाही. या वक्तव्याला भाजप पक्षाचे नेते वेगळेच वळण लावण्याचा प्रयत्न करत आहेत.

आमच्या मनात असले विचार येतं नाहीत. आम्ही महात्मा गांधी यांच्या विचारांचे लोक आहे. केंद्र सरकार राजकारण करत आहे.

ऊर्जा खात्याची परिस्थिती अंधारात गेली आहे. केंद्र सरकार डबल गेम खेळत आहे. चालू बिल भरण्यास सांगितले होते. त्याला सुद्धा भाजपा विरोध करत आहे.