पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्यात मंत्रिमंडळ विस्तारावर अंतिम चर्चा झाल्यानंतर आता मंत्र्याची नावं निश्चित करण्यात आली आहे. नारायण राणे यांचा मंत्रिमंडळात समावेश होण्याची शक्यता आहे.

राणे यांना स्थान मिळणं निश्चित

राणे यांना तातडीने दिल्लीला बोलावण्यात आलं आहे. भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा यांच्या कार्यालयातून राणे यांना फोन करण्यात आला होता. केंद्रीय मंत्रिमंडळ विस्तारात राणे यांना स्थान मिळणं जवळपास निश्चित मानलं जात आहे.

राणे-नड्डा यांची भेट होणार

केंद्रीय मंत्रिमंडळाचा उद्या विस्तार होणार असल्याची जोरदार चर्चा आहे. भाजपसह अन्य सहयोगी पक्षातील 17 ते 20 राज्यसभा आणि लोकसभा खासदार संभाव्य मंत्रिमंडळ विस्तारात केंद्रीय मंत्रिपदाची शपथ घेण्याची शक्यता आहे.

Advertisement

राणे यांचं नाव केंद्रीय मंत्रिमंडळ विस्तारात सुरुवातीपासूनच चर्चेत होतं. दिल्लीत राणेंची जे पी नड्डा यांच्याशी भेट झाल्यानंतर यावर अधिकृत शिक्कामोर्तब होण्याची शक्यता आहे.

कोणाकोणाची वर्णी लागणार

2019 मध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी दुसऱ्यांदा सत्तेत आले; मात्र दुसऱ्या टर्ममध्ये त्यांनी एकदाही मंत्रिमंडळाचा विस्तार केलेला नाही; परंतु आता मंत्रिमंडळाचा विस्तार होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.

आसामचे माजी मुख्यमंत्री सर्वानंद सोनोवाल, ज्योतिरादित्य शिंदे, नारायण राणे आणि हीना गावित यांचाही मंत्रिमंडळात समावेश होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.

Advertisement

अनेक मंत्र्यांच्या खात्यांमध्ये फेरबदल

शिवसेना, शिरोमणी अकाली दल एनडीएतून बाहेर पडले आहेत. तर लोजप नेते रामविलास पासवान यांचं निधन झाल्याने मंत्रिमंडळातील त्यांचं पद रिक्त आहे. त्याशिवाय अनेक मंत्र्यांच्या खात्यांमध्ये फेरबदल केला जाण्याची शक्यता आहे.

 

 

Advertisement