पुणे – भारतीय जनता पार्टी यांच्यावतीने देशाचे (PM Birthday) पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांच्या वाढदिवसानिमीत्त एका बुद्धीजीवी संमेलनाचे आयोजन करण्यात आले आहे. हा कार्यक्रम शनिवारी (दि.29) दुपारी चार वाजता लायन्स क्लब हॉल, तळेगांव दाभाडे येथे होणार असून हा सर्व श्रोत्यांसाठी खुला असणार आहे.

मोदींचे व्यक्तिमत्त्व, भारताच्या विकासाचे मोदींचे धोरण, मोदींचे सर्वांगीण ध्येय, ते ध्येयधोरण पूर्ण करण्यासाठी मोदींनी आखलेली पावले व त्याला गेल्या आठ वर्षात मिळालेले यश या विषयावर मांडणी करण्यासाठी आपल्या शहरातील ज्येष्ठ व तज्ज्ञ मंडळींना आमंत्रित करण्यात आलेले आहे.

2014 ते 2022 या 8 वर्षात देशात झालेले परिवर्तन मांडताना ही तज्ज्ञ मंडळी आपापल्या क्षेत्रातील सकारात्मक (PM Birthday) बदल मांडणार आहेत.

दरम्यान, यावेळी सुरेश साखवळकर – सामाजिक क्षेत्र, सुनंदाताई जोशी – महिला सशक्तीकरण, रामदास काकडे – उद्योग क्षेत्र ,रि. ग्रुप कॅप्टन साठे सर – संरक्षण क्षेत्र, किरण परळीकर – सर्वसामान्य जीवन व आर्थिक उन्नती, संतोष भेगडे पाटील – सांस्कृतिक, धार्मिक, अध्यात्मिक भारत ,

डॉ. अमित वाघ – वैद्यकीय क्षेत्र,डॉ. राहुल मुंगीकर – शेती, पर्यावरण, डॉ. प्रमोद बोराडे – इतिहास व सामाजिक भारत , स्वानंद आगाशे- आर्थिक क्षेत्र,ऍड. विनय दाभाडे- न्याय व विधी क्षेत्र केदार तापीकर – शिक्षण क्षेत्र या सदर माहितीपूर्ण कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.

या कार्यक्रमाला माजी आमदार व राज्यमंत्री बाळा भेगडे, भाजपा जिल्हाध्यक्ष गणेश भेगडे व भाजपा मावळ तालुकाध्यक्ष रविंद्र भेगडे , भाजपा महाराष्ट्र प्रदेशाचे मुख्य प्रवक्ते केशवराव उपाध्ये आदी उपस्थित राहणार आहेत.