दहावीला तब्बल 95 टक्के गुण मिळवून यशस्वी झालेल्या व सध्या बारावीत सलेल्या नॅशनल हॉर्स रायडर श्रीया गुणेश पुरंदरे (वय-17, रा. नांदेड सिटी) हिने इमारतीच्या अकराव्या मजल्यावरून उडी घेत आत्महत्या केली.

आत्महत्येच्या कारणांचा शोध

आज सकाळी 9 वाजेच्या सुमारास गॅलरीत व्यायाम करणारे अभिजीत देशमुख यांना काहीतरी जोरात खाली पडल्याचा आवाज आला. त्यांनी खाली पाहिले असता त्यांच्या मुलीच्या वर्गात शिकणारी श्रीया पडली असल्याचे दिसून आले.

देशमुख यांनी तातडीने ही माहिती हवेली पोलिस ठाण्याला दिली. माहिती मिळाल्यानंतर हवेली पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक सदाशिव शेलार यांनी तात्काळ घटनास्थळी जाऊन पाहणी केली.

Advertisement

मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी ससून रुग्णालयात पाठविण्यात आला असून हवेली पोलिसांकडून आत्महत्येच्या कारणांचा शोध घेण्यात येत आहे.

श्रीया होती नॅशनल हॉर्स रायडर……

श्रीया ही अत्यंत गुणी मुलगी होती. तसेच तिच्या घरातील वातावरणही खेळीमेळीचे होते. श्रीयाच्या वडीलांची हॉर्स राडींगची ॲकॅडमी आहे. त्यामध्ये बालपणीपासून श्रीया हॉर्स रायडींगचे धडे घेत होती.

राज्य व राष्ट्रीय पातळीवर श्रीयाने हॉर्स रायडींगमध्ये अनेक पारितोषिके पटकावली आहेत. सर्व काही ठीक असताना श्रीयाने इतके टोकाचे पाऊल का उचलले याबाबत पोलीस अधिक तपास करत आहेत.

Advertisement