पुणे – द्रौपदी मुर्मू (draupadi murmu) आता देशाच्या नव्या राष्ट्रपती असतील. मतमोजणीच्या तिसऱ्या फेरीपर्यंत (President Election) त्यांनी निर्णायक आघाडी घेतली आहे. दुसरीकडे, विरोधी पक्षाचे उमेदवार यशवंत सिन्हा (yashwant sinha) त्यांच्यापेक्षा खूपच मागे आहेत. आकडेवारीनुसार, द्रौपदी मुर्मू (draupadi murmu) यांना एकूण 2.824 मते मिळाली (President Election) आहेत. या मतांची किंमत 6,76,803 आहे.

देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देखील द्रौपदी मुर्मू यांच्या निवासस्थानी पोहोचून त्यांचे अभिनंदन केले आहे. याशिवाय राजकारणातील अनेक दिग्गज त्यांचे अभिनंदन करत आहेत.

द्रौपदी मुर्मू (draupadi murmu) 25 जुलै रोजी देशाच्या 15व्या राष्ट्रपती म्हणून शपथ घेणार आहेत. शपथ घेताच त्या देशाच्या सर्वात तरुण राष्ट्रपती बनतील.

याआधी देशातील सर्वात तरुण राष्ट्रपती होण्याचा विक्रम नीलम संजीव रेड्डी यांच्या नावावर होता. विद्यमान राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांचा कार्यकाळ 24 जुलै रोजी संपत आहे.

दरम्यान, या शपथग्रहण सोहळ्यासाठी राष्ट्रपती भवनात आयोजित करण्यात येणारे स्नेहभोजन शुद्ध शाकाहारी ठेवावे, अशी मागणी शाकाहारचे पुरस्कर्ते व सर्वजीव मंगल प्रतिष्ठानणचे संस्थापक अध्यक्ष डॉ. कल्याण गंगवाल यांनी केली आहे.

अध्यात्मिक बैठक असणाऱ्या द्रौपदी मुर्मू (draupadi murmu) यांनी या शपथग्रहण सोहळ्यावेळी शाकाहारी भोजनच ठेवावे असं मत डॉ. कल्याण गंगवाल (Dr Kalyan Gangwal) यांनी व्यक्त केलं आहे.

तसेच, या मागणीचे निवेदन ई-मेलद्वारे राष्ट्रपती भवन, पंतप्रधान नरेंद्र मोदी, गृहमंत्री अमित शहा यांना पाठवले असल्याचे त्यांनी सांगितले. यावेळी ते पुण्यात बोलत होते.

यावेळी डॉ. कल्याण गंगवाल (Dr Kalyan Gangwal) म्हणाले की, राष्ट्रपतींच्या शपथग्रहण सोहळ्याला उपस्थित राहणाऱ्या राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय पातळीवरील नेते मंडळींसाठी शाही भोजन आयोजिले जाते.

शाकाहार आणि अहिंसा भारतीय संस्कृती आणि परंपरेचा वारसा आहे. आज पंतप्रधान नरेंद्र मोदी, गृहमंत्री अमित शाह, राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू हे शुद्ध शाकाहारी आहेत.

शाकाहाराचे महत्व करोना काळाताही अधोरेखित झाले आहे. त्यामुळे शाकाहार जगभरात पोहचवण्यात मदत व्हावी, यासाठी राष्ट्रपती भवनातील भोजन केवळ शाकाहारी असावे. असं त्यांनी सांगितलं आहे.