पुणे : येथील नवले पुलावर (Navale bridge) अपघाताचे (Accident) सत्र सुरुच आहे. या पुलाच्या तीव्र उतारामुळे सतत अपघात होत असतात. त्यामुळे शिवसेनेकडून (Shivsena) जनआक्रोश आंदोलन करण्यात आले आहे.

काल मंगळवारी नवले ब्रिजवर ट्रकचा ब्रेक (Truck Break Fail) फेल झाल्यामुळे ३ जणांचा ट्रकखाली चिरडून मृत्यू (३ Death) झाला आहे. या पुलावर सतत अपघात होत असतात.

त्यामध्ये अनेक निष्पाप नागरिकांचे बळी जातात. काल झालेल्या अपघातात चेतन सोळंकी नावाच्या तरुणाचा मृत्यू झाला आहे. या तरुणाचे अवघे १५ दिवसांपूर्वीच लग्न झाले होते.

Advertisement

नवले ब्रिज वर होत असलेल्या अपघाताबाबत राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाकडून (National Highways Authority) आतापर्यंत कोणत्याही ठोस उपाययोजना करण्यात आलेल्या नाहीत.

त्यामुळे या बेजबाबदार प्राधिकरणाचा निषेध करण्यासाठी वारजे (Warje) येथे राष्ट्रीय राजमार्ग प्राधिकरण कार्यालयावर (National Highways Authority Office) शिवसेनेकडून आक्रोश आंदोलन करण्यात आले.

राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाकडून तात्काळ उपाययोजना न केल्यास अधिकाऱ्यांना काळे पासून मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्याची मागणी केली जाईल असा इशारा शिवसेना नेते निलेश गिरमे (Nilesh Girme) यांनी दिला आहे.

Advertisement

या आंदोलनावेळी विजय कणसे, नीलेश पोवर, वैभव थोपटे, लोकेश राठोड, आदित्य वाघमारे, शुभम देशभ्रतार, गौरव देशभ्रतार, सार्थक जाधव, आकाश चव्हाण आदी शिवसेनेचे कार्यकर्ते उपस्थित होते.