पुणे – साताऱ्याहून मुंबईच्या दिशेने जाणाऱ्या भरधाव ट्रकचा काल रविवारी रात्री पावणेनऊ वाजता नवले पुलाजवळ ब्रेक निकामी झाला आणि मोठा अपघात झाला आहे. या अपघातात (Pune Accident) तब्बल 48 गाड्यांचे नुकसान झाले आहे. या अपघाताची (Accident) माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी पोहोचले असून, कंटेनर ने धडक दिल्याने गाड्या एकमेकांवर आदळल्या असल्याचा अंदाज व्यक्त केला गेला आहे.

दरम्यान, या अपघातामध्ये (Accident) तब्बल 8 ते 10 जण गंभीर जखमी झाले असून, कुठलीही जीवितहानी झालेली नाही. मात्र, या भीषण अपघातामुळे नवले ब्रिजवरील वाहतून विस्कळीत झाली आहे.

टँकरचा ब्रेक निकामी झाल्याने नवले ब्रिजवरील 30 वाहनांना जोरदार धडक बसली आहे. हा अपघात इतका भीषण होता, की कित्येक गाड्यांचा चक्काचूर झाला. यावेळी पुलावर वाहनांच्या लांबचलांब रांगा लागल्या होत्या मात्र, आता नवले पुलावरील वाहतूक हळूहळू पूर्वपदावर आली आहे.

दरम्यान या अपघाताविषयी राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी (Chief Minister Eknath Shinde) पोलिसांकडून माहिती घेतली असून, हा अपघात कुणाच्या निष्काळजीपणामुळे झाला तेही तपासण्याचे निर्देश मुख्यमंत्र्यांनी दिले आहेत.

तसेच अपघातातील जखमींना योग्य ते उपचार मिळण्याची व्यवस्था करण्याच्या सूचना देखील त्यांनी प्रशासनाला दिल्या आहेत. संदर्भातील एक ट्विट देखील मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Chief Minister Eknath Shinde) यांनी केलं आहे.

दरम्यान, हा अपघात इतका भीषण होता की, त्यामध्ये सुरक्षित मानल्या जाणाऱ्या मोठ्या कारचाही अक्षरशः चक्काचूर झाला होता. चालकाचे कंटेनरवरील नियंत्रण सुटल्याने त्याने रस्त्यावरून जाणाऱ्या 30 वाहनांना उडविले.

ही वाहने एकमेकांना धडकल्याने रस्त्यावर, रस्त्याच्या बाहेर फेकले गेले होते. पुण्यातील नवले पुलावरील वाढते अपघात चिंता वाढवणारे आहेत. या पुलावर सतत अपघात होत असतात.