पुणे – साताऱ्याहून मुंबईच्या दिशेने जाणाऱ्या भरधाव ट्रकचा काल रविवारी रात्री पावणेनऊ वाजता नवले पुलाजवळ (Navale Bridge) ब्रेक निकामी झाला आणि मोठा अपघात झाला आहे. या अपघातात (Pune Accident) तब्बल 48 गाड्यांचे नुकसान झाले आहे. या अपघाताची (Accident) माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी पोहोचले असून, कंटेनर ने धडक दिल्याने गाड्या एकमेकांवर आदळल्या असल्याचा अंदाज व्यक्त केला गेला आहे.

दरम्यान, या घटने नंतर आज सकाळी राष्ट्रवादीच्या नेत्या आणि खासदार सुप्रिया सुळे (supriya sule) यांनी नवले पुलावर जाऊन स्वतः पाहणी केली आहे. तसेच, नवले पुलावरील (Navale Bridge) अपघाताची संख्या शून्यावर येण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचं सुप्रिया सुळे (supriya sule) यांनी सांगितलं आहे.

त्यांनी पुण्यातील नवले पुलावरील (Navale Bridge) अपघातस्थळाची सुप्रिया सुळे (supriya sule) यांनी पाहणी केली त्यावेळी त्या बोलत होत्या. यावेळी रस्त्याची रचना, महापालिकेकडून फूटपाथ, सर्व्हिस रोड योग्य पद्धतीने बांधण्यात यावे, अशी मागणी त्यांनी महापालिकेकडे केली आहे.

या मार्गावर अपघात का होतात? याची योग्य माहिती घेऊन रोड एक्स्पर्टकडून त्रुटी दूर करायला हव्यात. अपघात सातत्याने होत असेल तर त्यावर उपाययोजना करुन अपघाताची संख्या शून्यावर कशी येईल याकडे लक्ष देणं गरजेचं आहे, असंही त्या म्हणाल्या.

त्या पुढे म्हणाल्या, 2021 मध्ये लोकसभेत नितिन गडकरी यांच्याकडे या पुलाबाबत चर्चा केली होती. त्यानंतर त्यांनी या मार्गाच्या काही भागावर उपाययोजना केली. मात्र काही महत्त्वाच्या बाबी अजूनही झालेल्या नाहीत.

त्यासोबतच या पुलावर तीव्र उतार आहे. आतापर्यंतच्या अपघाताला हा उतार कारणीभूत ठरला आहे. यावर पालिकेने उपाययोजना करणं गरजेचं आहे. शिवाय ज्या जागी सातत्याने अपघात होत आहे. या ठिकाणांचं निरीक्षण करुन ते निश्चित करायला हवेत. असं त्यांनी म्हटलं आहे.

दरम्यान, ही घटना घडल्यानंतर पोलीस, फायर ब्रिगेड, महापालिका आणि डॉक्टर्स यांनी तातडीने धाव घेऊन अपघातग्रस्तांना मदत पोहोचवली, त्यांचे देखील मी आभार मानते. अशी भावना त्यांनी (supriya sule) व्यक्त केली आहे.