पुणे – पुण्यातील नवले पुलावर (navle bridge accident) रविवारी ४८ वाहनांचा विचित्र अपघात (Pune Accident) झाला होता. या अपघातात ट्रक चालकाने तब्बल ४८ (navle bridge accident) वाहनांना जबर धडक दिली होती. यामुळे अनेक वाहनांचं प्रचंड नुकसान झालं होतं. अपघात इतका भीषण (navle bridge accident) होता की १० जण जखमी झाले. सुदैवानं कोणतीही जीवितहानी झाली नाही. मात्र या अपघातानंतर ज्या ट्रकमुळे (Truck Accident) हा अपघात घडला, त्या ट्रकचा चालक फरार होता. या चालकाला अखेर अटक करण्यात आली आहे.

अटक करण्यात आलेल्या चालकाचं नाव मनिराम यादव (Maniram Yadav) असं आहे. पसार झालेल्या एका ट्रकचालकाला चाकण परिसरातून अटक करण्यात आली.

मणीराम छोटेलाल यादव (वय २३, रा. मध्यप्रदेश), अमन राजबहादूरसिंग यादव (वय २४, रा. उत्तर प्रदेश) अशी अटक करण्यात आलेल्या ट्रकचालकांची नावे आहेत. बाह्यवळण मार्गावर नवले पूल परिसरात (navle bridge accident) रविवारी रात्री दोन वेगवेगळे अपघात झाले.

भरधाव ट्रकने रविवारी रात्री नऊच्या सुमारास वाहनांना धडक दिली. अपघातानंतर ट्रकचालक मणीराम छोटेलाल यादव पसार झाला होता. कात्रज बोगद्याच्या पुढे तीव्र उतारावर यादव याने वाहन न्यूट्रल स्थितीत चालविले होते.

अपघातानंतर ट्रक ताब्यात घेण्यात आला होता. तांत्रिक तपासात मणीराम यादव चाकण परिसरात असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. त्यानंतर सिंहगड पोलिसांनी त्याला चाकण परिसरातून अटक केली.

याबाबत सहायक पोलिस निरीक्षक प्रवीण जाधव यांनी फिर्याद दिली आहे. रविवारी रात्री झालेल्या दुसऱ्या अपघातात भरधाव ट्रकने सात वाहनांना धडक दिली. या अपघातात वाहनांचे नुकसान झाले. ट्रकचालक अमन यादव याला अपघाताच्या ठिकाणापासून काही अंतरावर ताब्यात घेण्यात आले.

दरम्यान, हा अपघात इतका भीषण होता की, त्यामध्ये सुरक्षित मानल्या जाणाऱ्या मोठ्या कारचाही अक्षरशः चक्काचूर झाला होता. चालकाचे कंटेनरवरील नियंत्रण सुटल्याने त्याने रस्त्यावरून जाणाऱ्या ३० वाहनांना उडविले.

ही वाहने एकमेकांना धडकल्याने रस्त्यावर, रस्त्याच्या बाहेर फेकले गेले होते. पुण्यातील नवले पुलावरील वाढते अपघात चिंता वाढवणारे आहेत. या पुलावर सतत अपघात होत असतात.