नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांनी संसदेत काँग्रेसवर (Congress) हल्लाबोल केला होता. त्यामुळे त्याच्यावर टीका करण्यात आली. या टीकेला मोडून काढण्यासाठी खासदार नवनीत राणा (Navneet Rana) यांनी मोदींनी केलेल्या कामाबाबत कौतुक करत त्यांची पाठराखण केली आहे.

मोदींनी संसदेत काँग्रेसवर आरोप केला होता. त्यामुळे काँग्रेस कार्यकर्त्यांकडून ठिकठिकाणी आंदोलनाचा इशारा देण्यात आला आहे. तसेच महाविकास आघाडीतील (Mahavikas Aghadi)  नेत्यांनीही या आरोपावरून मोदींवर टीका केली आहे.

दरम्यान खासदार राणा यांनी मोदींवर महाविकास आघाडीतील नेत्यांनी केलेल्या टिकेला प्रत्युत्तर देत, मोदींनी पालखी मार्ग महाराष्ट्राला (Maharashatra) दिला आहे. हा प्रकल्प १२,२९४ कोटी रुपयांचा आहे. आणि या पालखीमार्गाचे भूमीपूजन पतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते झाले आहे.

Advertisement

तसेच समृद्धी महामार्गालाही केंद्र सरकारने पैसे दिले, नागपूर-मुंबईला जोडणार हा मार्ग आहे. ७०१ किमीचा हा रस्ता असून अंदाजे ५५ हजार कोटी रुपये यासाठी खर्च येणार आहे.

या रस्त्याचे काम केंद्र सरकारने केले आणि नाव देण्याचे काम महाराष्ट्र सरकारने (Maharashtra Goverment) केले आहे, असे नवनीत राणा यांनी सांगितले आहे.

त्याचसोबत नवीन रेल्वे लाईन, अनेक मेट्रो प्रोजेक्टही (Metro Project) सरकारने केले. उडान योजनेंतर्गत आता नुकतेच सिंधुदुर्गात विमानतळ बनविण्यात आले आहे. नाशिक, जळगाव, सोलापूर, कोल्हापूर, नांदेड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग येथेही उद्घाटन झाले आहेत.

Advertisement

पंतप्रधानांनी कोविड (Covid) काळात हात वर नाहीत केले, तर जमिनीवरच काम केले आहे. शिवसेनेच्या ज्येष्ठ नेत्यांनी केवळ आरोप केले, ते शेतकऱ्यांवर बोलले नाहीत, ते गरिबांबाबत बोलले नाहीत, ना घरकुलबाबत बोलले, ना इंडस्ट्रीबाबत बोलले, असे म्हणत नवनीत राणा यांनी शिवसेनेवरही हल्लाबोल केला आहे.