मुंबई : शिवसेना (Shivsena) नेते संजय राऊत (Sanjay Raut) यांनी शिवसेना भवनात (Shivsena Bhawan) पत्रकार परिषद (Press Conference) घेणार असल्याचे सांगितल्यानंतर त्यांच्या वर जोरदार टीका करण्यात येत आहे. अशातच नवनीत राणा (Navneet Rana) यांनीही संजय राऊत यांच्यावर टीका केली आहे.

किरीट सोमय्यांनी (Kirit Somaiya) संजय राऊत यांच्यावर केलेल्या घोटाळ्याच्या आरोपानंतर राज्यातले राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. शिवसेना आणि भाजप (BJP) मध्ये सध्या आरोप सत्र सुरु असल्याचे दिसत आहे.

नवनीत राणा म्हणाल्या, संजय राऊत यांनी जर काहीचं केलेलं नाही. तर मग घाबरायचं कारण काय असं भाजपच्या नेत्या नवनीत राणा म्हणाल्या आहेत. तसेच ‘चोर की दाढ़ी में चूगार’ असे म्हणत संजय राऊत यांच्यावर टीका केली आहे.

Advertisement

आत्तापर्यंत मुंबईत झालेलं काँग्रेसचं आंदोलन असेल किंवा भाजपचं आंदोलन असेल. या आंदोलनामुळे राजकीय वातावरण किती तापलंय यांचा अनेकांना अंदाज आला असेल.

किरीट सोमय्या रोज भाजपच्या अनेक नेत्यांवरती टिका करत आहेत. तसेच मुख्यमंत्र्यांनी त्यांची चौकशी करावी असेही म्हणत आहेत.

संजय राऊत यांनी शिवसेना भवनात ४ वाजता ईडी आणि सीबीआय च्या कारवायांबाबत पत्रकार परिषद घेणार आहेत. तसेच भाजपचे साडेतीन लोक जेलमध्ये जाणार असेही सांगितले आहे.

Advertisement