नवी दिल्ली : अमरावतीच्या खासदार नवनीत राणा (Navneet Rana) यांनी लोकसभेत राज्य सरकार सुडाचे राजकारण करून त्यात भाजप (BJP) नेत्यांना अडकवत आहे, असा आरोप केला आहे.

वाईनच्या निर्णयाच्या विरोधात नवनीत राणा यांनी ठाकरे सरकारवर टीका करत लोकसभेत (Loksabha) हा मुद्दा उपस्थित केला होता.

तसेच आमदार रवी राणा (Ravi Rana) यांच्यावरील गुन्ह्याबाबत खासदार नवनीत राणा यांनी लोकसभेत प्रश्न उपस्थित राज्य सरकारवर हल्लाबोल केला आहे.

Advertisement

याचसोबत त्यांनी भाजप नेते किरीट सोमय्या (BJP leader Kirit Somaiya) हेही सध्या चांगलेच चर्चेत आहेत. पुण्यात किरीट समोय्या यांना धक्काबुक्की केल्याचा प्रकार पार दिल्लीपर्यंत पोहोचला आहे.

किरीट सोमय्या, नितेश राणे (Nitesh Rane) यांच्यासोबत जे झाले ते आमदार रवी राणा यांच्यासोबत महाराष्ट्रात होत आहे. असा आरोप नवनीत राणा यांनी लोकसभेत केला आहे.

तसेच पुढे त्यांनी सांगितले की भाजप आमदार नितेश राणे शिवसैनिक संतोष परब (Santosh Parab) हल्ला प्रकरणात गेल्या काही दिवसांपासून अटकेत होते.

Advertisement

नितेश राणेंना यांना सुडापोटी अडकवले जात असल्याचा आरोप भाजपकडून वेळोवेळी करण्यात आला आहे. तेच आता रवी राणांच्या बाबतीत होत आहे.असा आरोप त्यांनी केला आहे.

दरम्यान आमदार रवी राणा यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत. कुठल्या ना कुठल्या प्रकरणात अडकवा, असा आदेश उद्धव ठाकरेंनी दिल्याचे रवी राणा यांनी म्हटले आहे. देशात शाईफेकीच्या घटना घडल्या, पण ३०७ म्हणजेच जीवे मारण्याच्या प्रयत्नाचा माझ्यावर गुन्हा दाखल झाला आहे.

संजय राऊत, अनिल परब, दिलीप वळसे, मुख्यमंत्र्यांनी सीपींना फोन लावून सांगितले की रवी राणाला अटक करा. पण उद्धव ठाकरेंमध्ये हिंमत असेल, तर संजय राऊतांवरही ५०६ चा गुन्हा दाखल करा.

Advertisement

येणाऱ्या काळात उद्धव ठाकरे, अनिल परबच्या प्रॉपर्टींवर कारवाई होईल, आणि मीही पुरावे देईन, असे आरोप आमदार रवी राणा यांनी केले आहेत.