मुंबई : परमबीर सिंग (Parambir Singh) हे अंबानींच्या बंगल्याबाहेरील बॉम्ब प्लांटचे प्रमुख सूत्रधार असून याप्रकणी पुरावे देखील आहेत, असा गंभीर आरोप राष्ट्रवादी काँग्रेसचे (NCP) मुख्य राष्ट्रीय प्रवक्ते आणि अल्पसंख्याक मंत्री (Minister for Minorities) नवाब मलिक (Nawab Malik) यांनी केला आहे.

नवाब मलिक म्हणाले, याप्रकरणी कुरकुरे बालाजी (Kurkure Balaji) यांच्या ईमेलचा (E-Mail) उल्लेख आहे. इलेक्ट्रॉनिक (Electronic) पुरावे तयार करण्यासाठी पाच लाख रुपये देण्यात आले, याचाही उल्लेख आहे. असे असताना अडिशनल चार्जशीट दाखल करणार असल्याचे सांगूनही एनआयएने (NIA) चार्जशीट दाखल केली नाही.

केंद्र सरकारकडून (Central Goverment) परमबीर सिंग यांना वाचवण्याचा प्रयत्न सुरू आहे, असेही मलिक यांनी म्हटले आहे.

Advertisement

केंद्र सरकार परमबीर सिंग यांच्या माध्यमातून आघाडी सरकारला बदनाम करण्यासाठी व अडचणीत आणण्यासाठी कटकारस्थान रचत आहे असे नवाब मलिक यांनी म्हंटले आहे.

पुढे बोलताना नवाब मलिक म्हणाले, मनसुख हिरेन (Mansukh Hiren) हत्येचा एटीएस तपास करत असताना अजून सत्य बाहेर येणार होते, त्याचवेळी एनआयएने तपास हाती घेतला.

त्याचवेळी परमबीर सिंग यांच्या घरी बैठक झाली याचा उल्लेख आहे, त्याचबरोबर त्यांचे सर्व कटकारस्थान कोर्टात उघड होईल, असे नवाब मलिक यांनी स्पष्ट केले आहे.

Advertisement