मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांच्याबाबत नवाब मलिक (Nawab Malik) यांनी मोठी माहिती सांगितली आहे. पत्रकार परिषदेत (Press conference) त्यांना शरद पवार हे पतंप्रधान (Prime Minister) शर्यतीत आहेत का असा प्रश्न विचारण्यात आला होता.

या प्रश्नावर नवाब मलिक यांनी स्पष्ट शब्दात उत्तर दिले आहे. शरद पवार यांनी राष्ट्रवादी काँग्रेस (NCP) ३ राज्यात विधानसभा निवडणूका (Assembly elections) लढवणार असल्याचे जाहीर केले आहे.

त्यामुळे अनेक राजकीय चर्चाना उधाण आले आहे. याच पार्श्वभूमीवर नवाब मलिक यांना शरद पवार पंतप्रधान पदाच्या रेस मध्ये आहेत का असा प्रश्न विचारण्यात आला होता.

Advertisement

यावर बोलताना मलिक म्हणाले की, पंतप्रधानपदाच्या शर्यतीत शरद पवार नाहीत. शरद पवार हे भाजपला (BJP) पर्याय देण्यासाठीच्या कामात असून ते त्यासाठी प्रयत्न करत आहेत.

नेतृत्व कोण करणार, हा प्रश्न सध्या नाही. सध्याच्या घडीला पर्याय तयार करण्याचे काम सुरु आहे. शरद पवार हे पंतप्रधानपदाच्या शर्यतीत कधीच नव्हते, असे नवाब मालिकांनी सांगितले आहे.

उत्तर प्रदेशमध्ये (Uttar Pradesh) मंत्र्यांसह भाजपच्या आमदारांनी दिलेल्या राजीनाम्याने भाजपविरोधी लाट असल्याचे सिद्ध केले आहे.

Advertisement

उत्तर प्रदेशच्या निवडणुका आणखी जसजशा जवळ येतील, तसतसं अधिकाधिक रंजक गोष्टी पाहायला मिळतील. निवडणुकीसंदर्भात राष्ट्रवादीची रणनीति ठरली आहे.

अखिलेश यादव (Akhilesh Yadav) यांच्यासोबत प्रफुल्ल पटेल (Praful Patel) यांची सकारात्मक चर्चा झाली आहे. जागावाटपावरही कोणताही तिढा नाही, असे नवाब मलिक यांनी माध्यमांशी संवाद साधताना सांगितले आहे.

Advertisement