राष्ट्रवादी काँग्रेस आणि भाजप पुन्हा सत्तेत येण्याची चर्चा पंतप्रधान नरेंद्र मोदी व राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या भेटीनंतर सुरू झाली; परंतु ती शक्यता फेटाळताना राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते नबाब मलिक यांनी एक उदाहरण दिलं..ते म्हणजे नदीच्या दोन टोकाचं..पहिलं आणि शेवटचं टोक कधीच एकत्र येत नाही. दोन विचारधारा असलेल्या पक्षांचही तसंच असतं असं ते म्हणाले.

पवार-फडणवीस, पवार-मोदी यांची चर्चा

शरद पवार यांनी आज मोदी यांची भेट घेतली. तत्पूर्वी, पवार व राज्याचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांचीही दिल्लीत भेट झाली.

त्यामुळं राष्ट्रवादी काँग्रेस व भाजप जवळ येत असल्याच्या चर्चेला उधाण आलं आहे. मलिक यांनी ही शक्यता स्पष्ट शब्दांत फेटाळून लावली आहे.

Advertisement

दोन्ही पक्षांच्या विचारधारा पूर्णतः भिन्न

राष्ट्रवादीची विचारधारा आणि भाजपची विचारधारा पूर्णपणे वेगळी आहे राष्ट्रवादीचा राष्ट्रवाद आणि भाजपचा राष्ट्रवाद यांच्यात जमीन आस्मानाचं अंतर आहे.

असं असताना हे दोन्ही पक्ष एकत्र येणं शक्य नाही. त्यामुळं याबाबतच्या चर्चांमध्ये तथ्य नाही,’ असं मलिक यांनी स्पष्ट केलं.

तारीख पे तारीख पुन्हा येईन

‘राज्यातील महाविकास आघाडी सरकार हे किमान समान कार्यक्रमाच्या आधारावर स्थापन करण्यात आलेलं आहे. ते व्यवस्थित काम करत आहे. असं असताना काही लोक ‘तारीख पे तारीख’ देत मी पुन्हा येईन सांगत आहेत.

Advertisement

हवामान खात्याने अंदाज दिल्यावर पाऊस येतो, मात्र यांचा अंदाज खरा ठरत नाही,’ असा टोलाही नवाब मलिक यांनी या वेळी लगावला.