मुंबई : काँग्रेसचे (Congress) नेते नाना पटोले (Nana Patole) यांनी काल देवेंद्र फडणवीस (Devendra Fadanvis) यांच्या घराबाहेर आंदोलन करण्याचा इशारा दिला होता. त्यानंतर याच आंदोलनावरून राष्ट्रवादी काँग्रेसचे (NCP) नेते नवाब मलिक (Nawab Malik) यांनी निशाणा साधला आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांनी महाराष्ट्राबाबत केलेल्या वक्तव्यावरून राज्यात चांगलेच वातावरण तापले आहे. याचाच निषेध म्हणून काँग्रेसने भाजप (BJP) नेत्यांच्या घराबाहेर आंदोलने करण्याचा निर्णय घेतला होता.

या प्रकरणामध्ये आता राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने सहभाग घेतल्याचे दिसत आहे. नेत्यांच्या घराबाहेर आंदोलनावरून नवाब मलिक यांनी काँग्रेस वर निशाणा साधल्याचे दिसत आहे.

Advertisement

नवाब मलिक म्हणाले, कोणत्याही राजकीय पक्षाने अथवा राजकीय नेत्यांनी इतर नेत्यांच्या अथवा पक्षाच्या कार्यालयाबाहेर आंदोलन करणे चुकीचे आहे. अशाप्रकारे आंदोलने करणे योग्य नाही.

नेत्यांची घरे किंवा कार्यालयांबाहेर आंदोलनाचे अलीकडे सुरू झालेले प्रकार चुकीचे आहेत, अशी राष्ट्रवादी काँग्रेसची स्पष्ट भूमिका आहे. अशा प्रकारच्या आंदोलनांमुळे पोलीस प्रशासनावर विनाकारण ताण येतो असे नवाब मलिक यांनी सांगितले आहे.

या सर्व प्रकरणावरून अतुल लोंढे (Atul londhe) यांनी प्रतिक्रिया दिली आहे. ज्या पद्धतीने अर्वाच्य भाषा भाजप नेत्यांनी वापरली, मारहाणीची धमकी दिली त्याबद्दल नवाब मलिक यांनी नाराजी व्यक्त केली असती तर जास्त सयुक्तिक झाले असते.

Advertisement

पंतप्रधान मोदींचे वक्तव्य आणि त्यावर भाजप नेत्यांचे मौन याचा निषेध करण्यासाठी आम्ही गेलो होतो. मुळात नेत्यांची घरे किंवा पक्ष कार्यालयावर आंदोलने नेण्याची प्रथा भाजपने सुरू केली आहे.

यापूर्वी ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्या घराबाहेर आंदोलनाचा प्रयत्न झाला होता. भाजपने काही दिवसांपूर्वी काँग्रेसच्या टिळक भवन कार्यालयाबाहेर आंदोलन केले. त्यावेळी नवाब मलिक यांनी विरोध केला असता, टीका केली असती तर बरे झाले असते.

Advertisement