Punelive24.com
Latest News, Videos, Web Stories and Photos from Pune

राष्ट्रवादी काँग्रेसने एका दगडात मारले दोन पक्षी!

पुणे महानगरपालिकेची निवडणूक डोळ्यावर आली असताना राष्ट्रवादी काँग्रेसने ती कोणत्याही परिस्थितीत जिंकायचीच असा निर्धार केला आहे, तर पुन्हा सत्ता खेचून आणणण्यासाठी भाजपनेही ताकद पणाला लावायचे ठरविले आहे. त्यातूनच शह-काटशहाचे राजकारण सुरू झाले आहे.

वचपा काढण्यासाठी राष्ट्रवादीचे धक्कातंत्र

पुणे महानगरपालिका निवडणुकीत मागच्या पराभवाचा वचपा काढण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून जोरदार तयारी सुरू आहे.

पुणे महानगरपालिका निवडणुकीला सहा- सात महिन्यांचा अवधी बाकी असतानाच राष्ट्रवादी काँग्रेसने भाजपला धक्के देण्यास सुरुवात केली आहे.

Advertisement

विधानसभा निवडणुकीत भाजपवासी झालेले माजी स्थायी समिती सभापती सदानंद शेट्टी यांनी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला.

या प्रवेशाने माजी खासदार, भाजप प्रदेश उपाध्यक्ष संजय काकडे यांच्या गटाला धक्का बसला आहे. शेट्टी यांच्या पत्नी काँग्रेसच्या विद्यमान नगरसेवक आहेत.

यांचेही प्रवेश

माजी खासदार काकडे यांनी शेट्टी यांना भाजपमध्ये घेऊन काँग्रेसला धक्का देण्याचे काम केले होते. पुणे कॅन्टोन्मेन्ट मतदारसंघात भाजपच्या विजयाला हा पक्ष प्रवेश महत्वाचा ठरला होता.

Advertisement

आता पालिका निवडणुकीला सात महिन्यांचा कालावधी शिल्लक असतानाच शेट्टी यांनी राष्ट्रवादीचे घड्याळ हातात बांधले आहे.

याशिवाय माजी स्थायी समिती अध्यक्ष आणि काँग्रेसचे जुने नेते श्रीकांत शिरोळे यांनी काँग्रेसला सोडचिठ्ठी देत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत राष्ट्रवादीत प्रवेश केला.

याशिवाय वानवडी भागातील भाजपचे प्रफुल्ल जांभुळकर आणि काँग्रेसचे केव्हीन मॅन्युअल यांनीही राष्ट्रवादीत प्रवेश केला.

Advertisement

 

Leave a comment