पुणे : राज्यात कोरोनाचे संकट दाट होत असतानाच राष्ट्रावादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार (NCP Leader Sharad Pawar) यांच्या कन्या खासदार सुप्रिया सुळे (MP Supriya Sule) यांना कोरोनाची लागण (Corona infection) झाली आहे.

याबाबत खासदार सुप्रिया सुळे (Supriya Sule) यांनी स्वतः ट्विट करून माहिती दिली आहे. त्यांच्या प्रकृतीबाबत अद्याप कोणतीही माहिती मिळालेली नाही. त्यांचे पती सदानंद सुळे (Sadanand Sule) याना देखील कोरोनाची लागण झाली आहे.

सुप्रिया सुळे यांनी ट्विट मध्ये सांगितले आहे की, मी आणि सदानंद आम्हा दोघांचीही कोरोना टेस्ट पॉझिटिव्ह (Corona Positive) आली आहे. काळजी करण्याचे कारण नाही.

Advertisement

आमच्या संपर्कात आलेल्या सर्वानी कोरोना टेस्ट करून घ्यावी, ही नम्र विनंती. असे खासदार सुप्रिया सुळे यांनी ट्विट (Twit) करून माहिती दिली आहे.

राज्य आणि जिल्हा प्रशासन कोरोना प्रतिबंधक नियमावली सादर करत आहे. कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव पाहत राज्यातील सर्व रुग्णालये सज्ज करण्यात आली आहेत.

तसेच कोरोना चाचण्या देखील वाढवण्यात आल्या आहे. राज्य शासनाकडून कोरोना प्रतिबंधक लसीचा वेगही वाढवण्यात आला आहे. रात्रीच्या वेळी जमावबंदी देखील लावण्यात आली आहे.

Advertisement