पुणे : केंद्रीय गृहमंत्री अमित शाह (Union Home Minister Amit Shah) यांचा अहमदनगर (Ahmednagar) नंतर आता पुणे (Pune) दौरा सुरु आहे. अमित शाह यांनी पुण्यातील दगडूशेठ गणपतीची पुजा करून दौऱ्याला सुरुवात केली आहे.

राष्ट्रवादी काँग्रेस (NCP) पक्षाकडून अमित शाह चले जाओ’ च्या घोषणा देत आंदोलन करण्यात येत आहे. महाराष्ट्राचे कुलदैवत छत्रपती शिवाजी महाराज (Chhatrapati Shivaji Maharaj) यांच्या पुतळ्याची कर्नाटक मध्ये विटंबना करण्यात आली आहे.

कर्नाटक (Karnatak) राज्यात भाजपचे सरकार आहे. या अगोदरही बेळगाव (Belgum) मध्ये शिवाजी महाराजांच्या पुतळ्याची विटंबना करण्यात आली होती.

Advertisement

कर्नाटक राज्यात छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यासोबत वाईट कृत्य केल्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेसकडून आंदोलन (Nationalist Congress Movement) करण्यात येत आहे.

पुणे शहर राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यास अभिषेक घालून वंदन करण्यात आले. कर्नाटक चे मुख्यमंत्री बसवराज बोम्मई (Karnataka Chief Minister Basavaraj Bommai) यांनी कर्नाटक राज्यात छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याची विटंबना करण्यात आली याबद्दल बोलताना त्यांनी वादग्रस्त वक्तव्य केले आहे. ते म्हणाले ही घटना किरकोळ आहे.

कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांनी असे वक्तव्य केल्यामुळे राज्यभरातून निषेध व्यक्त केला जात आहे. अमित शहा पुणे दौऱ्यावर असल्यामुळे याचा निषेध म्हणून राष्ट्रवादी काँग्रेस कडून आंदोलन करण्यात येत आहे.

Advertisement

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे शहराध्यक्ष प्रशांत जगताप (City President Prashant Jagtap) यांच्या नेतृत्वाखाली पुणे राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने आज जंगली महाराज रस्त्यावरील झाशीच्या राणी लक्ष्मीबाई यांच्या पुतळ्याजवळ तीव्र आंदोलन करण्यात आले.