मुंबई : राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Chief Minister Uddhav Thackeray) यांची शस्त्रक्रिया (Surgery) झाली आहे त्यामुळे ते कामावर रुजू झालेले नाहीत. त्यावरून विरोधी पक्षाकडून (Opposition) मुख्यमंत्र्यांवर टीका केली जात आहे.

विरोधी पक्षच्या नेत्यांकडून मुख्यमंत्र्यांचा चार्ज दुसऱ्याकडे देण्याची मागणीही केली जात आहे. राज्यात कोरोनाचे रुग्ण (Corona Patients) वाढत असल्यामुळे आता पुन्हा एकदा मुख्यमंत्री कामावर कधी रुजू होणार असा प्रश्न विचारला जात आहे.

भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील (Chandrakant patil) यांनी काही दिवसांपूर्वी मुख्यमंत्र्यांवर टीका केली होती. त्याला चोख प्रत्युत्तर नीलम गोऱ्हे (Neelam Gorhe) यांनी दिले आहे. मुख्यमंत्र्यांची पाठराखण करत गोऱ्हे यांनी चंद्रकांत पाटलांवर निशाणा साधला आहे.

Advertisement

मुख्यमंत्री ऑन फिल्डच आहेत (CM on the field). ज्यांनी डोळ्यावर पट्टी बांधलीये त्याला काय करावे. जनतेच्या मनात मुख्यमंत्री जोडले गेलेत. विरोधकांची दृष्टी अधू झालीये. चंद्रकांत दादांना एखादे उपमाचे पुस्तक आणून द्यावे असे निलम गोऱ्हेंने म्हटले आहे.

कोरोना व ओमिक्रॉन (Omicron) वाढत्या रुग्णसंख्येचा लहान मुलांनाही धोका वाढला असल्याने शाळा बंद करण्याचा निर्णय घ्यावा लागला आहे. त्यामुळे शाळा सुरू करण्यासाठी सरकारवर प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्ष दबाव आणू नये.

मुले बाधित झाली तर त्यांच्या जीवाला त्रास होईल आणखी मुल बाधित होतील, अशी भीतीही नीलम गोऱ्हे यांनी व्यक्त केली आहे. त्याचबरोबर गडकिल्ले आणि पूजास्थान विकसित करणार असल्याचेही त्यांनी सांगितले आहे.

Advertisement