Neem Oil for Skin: चेहऱ्यावर कडुलिंबाचे तेल लावल्याने त्वचेच्या अनेक समस्या होतील दूर, वाचा सविस्तर

0
20

Neem Oil for Skin: कडुलिंब या औषधी वनस्पतीचा फार पूर्वीपासूनच आरोग्य समस्या दूर करण्यासाठी वापर केला जातो. तर याच्या पानांबरोबरच कडुलिंबाचे तेलही आरोग्य व त्वचेसाठी देखील खूप फायद्याचे मानले जाते. हे तेल चेहऱ्यावर लावल्याने त्वचेच्या अनेक दूर करण्यास मदत होते.

याच्या तेलात असणारे गुणधर्म त्वचेच्या विविध समस्या दूर करतात. हे चेहऱ्यावर नियमित लावल्याने तुम्हाला अनेक फायदे मिळू शकतात. चला तर मग जाणून घेऊया चेहऱ्यावर कडुलिंबाचे तेल लावल्याने काय फायदे मिळतात.

फ्रिकल्सची समस्या कमी होईल

कडुलिंबाचे तेल चेहऱ्यावर लावल्याने फ्रिकल्सची समस्या कमी होते. यासाठी रात्री झोपण्यापूर्वी कडुलिंबाच्या तेलाने चेहऱ्याला मसाज करा. यानंतर रात्रभर राहू द्या. सकाळी कोमट पाण्याने चेहरा धुवा. काही आठवड्यांतच फ्रिकल्स कमी होऊ लागतील. यासोबतच टॅनिंगची समस्याही कमी होऊ शकते.

खाजेपासून सुटका होईल

याच्या तेलात अँटी-बॅक्टेरियल गुणधर्म आढळतात. तसेच, ते अँटी-फंगल आणि अँटी-व्हायरल गुणधर्मांनी समृद्ध आहे, जे त्वचेची खाजेपासून आणि पुरळांपासून सुटका मिळवून देतील.

वृद्धत्वाची समस्या दूर होईल

हे तेल चेहऱ्यावर लावल्याने वृद्धत्वाची समस्या दूर होऊ शकते. या तेलामध्ये अँटीऑक्सिडंट्स आणि वृद्धत्वविरोधी गुणधर्म असतात, जे त्वचेवरील सुरकुत्या आणि बारीक रेषांची समस्या कमी करण्यासाठी प्रभावी आहेत.

मुरूम कमी होतील

कडुलिंबाच्या तेलाने पिंपल्सचा त्रास कमी होऊ शकतो. या तेलामध्ये अँटी-फंगल- आणि अँटी-बॅक्टेरियल गुणधर्म असतात, ज्यामुळे मुरुमांचा त्रास कमी होतो. यासोबतच त्वचेवरील डाग आणि डागांच्या समस्यांपासून सुटका मिळेल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here