शेजाऱ्यांनी मारलेले टोमणे,भांडणे आणि मारहाणीला कंटाळून महिलेने विहिरीत उडी मारून आत्महत्या केली. तिने आत्महत्येपूर्वी लिहिलेल्या चिट्ठीमुळे पोलिसांनी शेजारच्या एकाच कुटुंबातील पाच जणांवर गुन्हे दाखल करून, त्यांना अटक केली.

ही आहेत आरोपींची नावे

अनिता संभाजी पडवळ (राहणार अष्टविनायक रेसिडेन्सी) या महिलेस आत्महत्या करण्यास प्रवृत्त केल्याप्रकरणी पोलिसांनी राहुल गंगाधर दुशिंग, रुपाली राहुल दुशिंग, प्रवीण गंगाधर दुशिंग, राजश्री प्रवीण दुशिंग, गंगाधर भागाजी दुशिंग (सर्व राहणार अष्टविनायक रेसिडेन्सी खोडद रोड नारायणगाव,तालुका जुन्नर) या एकाच कुटुंबातील पाच जणांना अटक आहे.

काय घडले ?

आरोपी व अनिता पडवळ हे अष्टविनायक रेसिडेन्सी सोसायटीत शेजारी राहण्यास होते. अनिताला आरोपी वेळोवेळी टोमणे मारून मानसिक त्रास देत होते. भांडणातून आरोपींनी अनिता यांना शिवीगाळ व मारहाण केली होती.

Advertisement

आरोपींच्या त्रासाला कंटाळून आत्महत्या करत असल्याची चिठ्ठी लिहुन अनिता यांनी पाटे खैरे मळा येथील विहिरीत उडी मारून आत्महत्या केली. त्यांचा मृतदेह विहिरीत आढळून आला.

पोलिस तपास सुरू

या प्रकरणी विशाल संभाजी पडवळ यांनी दिलेल्या फिर्यादीवरून पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. सहायक पोलिस निरीक्षक पृथ्वीराज ताटे यांचे मार्गदर्शनाखाली पुढील तपास फौजदार हिंगे पाटील करत आहेत.

 

Advertisement