Punelive24.com
Latest News, Videos, Web Stories and Photos from Pune

गिफ्ट मध्ये या गोष्टी कधीही करू नका भेट अन्यथा तुमच्यावरच येऊ शकते संकट

आपल्या संस्कृतीमध्ये कोणत्याही मंगल प्रसंगी भेटवस्तू देणे चांगले समजले जाते. मात्र भेटवस्तू देताना अनेक गोष्टी लक्षात ठेवणे गरजेचे आहेत.

कोणत्याही व्यक्तीला भेटवस्तू देणे म्हणजे त्या व्यक्ती प्रति आपल्या प्रेम भावना व्यक्त करणे होय. भेटवस्तू च्या माध्यमातून आपण आपल्या शुभेच्छा त्या व्यक्तीपर्यंत पोहोचवत असतो.

कोणत्याही व्यक्तीला भेटवस्तू मध्ये देवाची मूर्ती किंवा फोटो देऊ नये.आपण देवाची भक्ती करत असतो त्यांना पुजत असतो त्यामुळे त्यांची मूर्ती किंवा फोटो आपण स्वतः विकत घेतली पाहिजे.

Advertisement

यासोबतच भेटवस्तू मध्ये वाहणाऱ्या पाण्याचे शोपीस घेऊ नये. वास्तुशास्त्रात सांगितले आहे की असे केल्याने आर्थिक नुकसान होऊ शकते.

कोणतीही धारदार वस्तू भेटवस्तू म्हणून कधीही कोणालाही देऊ नये असे केल्याने भेटवस्तू देणाऱ्या आणि घेणाऱ्या दोघांनाही अनेक संकटांचा सामना करावा लागतो. त्यामुळे धारदार वस्तू भेट म्हणून देणे टाळावे.

भेटवस्तू मध्ये रुमाल देणे सुद्धा अशुभ मानले जाते. वास्तुशास्त्रात असे सांगितले आहे की कोणत्याही व्यक्तीला रुमाल भेटवस्तू दिल्यास वातावरणात निगेटिव्हिटी म्हणजेच नकारात्मकता पसरते. याचा नात्यांवर वाईट परिणाम होतो.

Advertisement
Leave a comment