Health Tips: जेवल्यानंतर थंड पाणी पिण्याची चूक कधीही करू नका, अन्यथा होऊ शकतात ‘या’ समस्या

0
20

Health Tips: तहान लागली की तोंडाचा कोरडेपणा घालवण्यासाठी सर्वात आधी पाणी आठवते. तसेच काही खाल्यानंतर किंवा जेवणानंतर आपल्याला पहिल्यांदा पाणी लागते. अशात अनेकांना जेवणानंतर थंड पाणी प्यायला आवडते. पण ही सवय आरोग्यासाठी हानिकारक ठरू शकते.

कारण जेवण केल्यानंतर किंवा काही खाल्यानंतर जर लगेच थंड पाणी पिले तर आरोग्याच्या अनेक समस्या निर्माण होऊ शकतात. चला तर मग जाणून घेऊया खाल्यानंतर थंड पाणी पिणे कशाप्रकारे हानी पोहचवते.

हृदयासाठी हानिकारक

खाल्ल्यानंतर थंड पाणी पिण्याची सवय तुमच्या हृदयाला हानी पोहचवू शकते. ज्यांना जेवताना थंड पाणी पिण्याची सवय असते त्यांना हृदयविकाराचा त्रास होऊ शकतो. तसेच थंड पाण्याच्या सेवनाने हृदयाचे ठोके कमी होतात. त्यामुळे रक्तप्रवाह थांबतो आणि हृदयविकाराचा झटका येऊ शकतो.

बद्धकोष्ठतेची समस्या वाढते

जेवणानंतर थंड पाणी पिल्याने पोटाचे मोठे आतडे आकुंचन पावते. त्यामुळे अन्न पोटात राहून बद्धकोष्ठतेचा त्रास होतो. दुसरीकडे, ज्या लोकांना बद्धकोष्ठतेची समस्या आहे त्यांनी थंड पाण्याचे सेवन करू नये. अन्यथा समस्या आणखी वाढू शकते.

खोकला-सर्दी-तापाचा त्रास वाढतो

खाल्यानंतर कधीही थंड पाणी पिऊ नये कारण यामुळे शरीरात श्लेष्मा निर्माण होत असतो. ज्यामुळे खोकला-सर्दी-तापाची समस्या उद्भवू शकते. म्हणूनच थंड पाण्याऐवजी साधे पाणी पिण्याची सवय लावा

लठ्ठपणा वाढतो

थंड पाण्याचा पचनशक्तीवर परिणाम होतो याने अन्न नीट पचत नाही. अशात बद्धकोष्ठतेचा त्रास वाढतो. त्याचप्रमाणे अन्नासोबत घेतलेले पाणी पोटात असलेल्या ऍसिडसह चरबीमध्ये रूपांतरित होते. त्यामुळे लठ्ठपणा वाढू लागतो.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here