सिमेंट उद्योगातील कामगारांना नवी वेतनश्रेणी

सिमेंट व त्यावर उद्योगातील कामगारांना 21 हजार रुपये किमान वेतन लागू करण्यासंदर्भात तत्वत: मान्यता देण्यात आली. कामगारांना किमान समान वेतन लागू करण्यात आलेले आहे.

२१ हजार किमान वेतन

सिमेंट उद्योगात काम करणाऱ्या कामगारांना सध्या अल्प वेतन मिळत आहे. त्यामुळे या परिपत्रकात बदल करून किमान वेतन यादीमध्ये दुरुस्ती करावी आणि सिमेंट उद्योगातील कामगारांना एकवीस हजार रुपये किमान वेतन देण्यात यावे अशी मागणी चंद्रपूर जिल्ह्याचे पालकमंत्री विजय वडेट्टीवार यांनी केली होती. त्यानुसार झालेल्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला.

वेतनवाढीच्या कार्यवाहीचे आदेश

चंद्रपूर जिल्ह्यात पाच सिमेंट उद्योग असून यामध्ये किमान 15 ते 20 हजार कामगार काम करीत आहे. कामगारांना अल्प वेतन देऊन त्यांचे शोषण होत असल्याची बाब विजय क्रांती कंत्राटी कामगार संघटनेने लक्षात आणून दिली होती.

किमान वेतन समितीसमोर सिमेंट उद्योगातील ठेका श्रमिकांबाबतचा प्रस्ताव सादर करावा, कामगारांना कोणत्याही परिस्थितीत योग्य किमान वेतन मिळणे आवश्यक आहे.

सिमेंट उद्योगातील ठेका श्रमिकांबाबत किमान वेतन समितीसमोर वेतनवाढीबाबत शासनाच्या मार्गदर्शक सूचनांप्रमाणे कार्यवाही करावी, असे निर्देश मुश्रीफ यांनी दिले.

या वेळी आपत्ती व्यवस्थापन, मदत व पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार यांनी विविध संघटनांच्या, श्रमिक संघटनांच्या मागण्यांच्या माहितीबाबतही चर्चा केली.