पुणे : आपण बऱ्याच ठिकाणी पहिले आहे खाद्यपदार्थ (Food) घेताना किंवा खाताना आपल्याला ते खाद्यपदार्थ वर्तमानपत्रामध्ये (Newspaper) दिले जातात. पण आता दुकानदारांना (shopkeepers) वर्तमानपत्रे पॅकिंगसाठी (Packing ) वापरता येणार नाहीत.
अन्न आणि औषध प्रशासनाचे (Food and Drug Administration) नवे आदेश जरी केले आहे. कुठेच खाद्यपदार्थ पॅक करण्यासाठी वर्तमानपत्राचा यापुढे वापर करता येणार नाही.
वर्तमानपत्र प्रिंट (Newspaper Printing) करण्यासाठी वापरण्यात येणाऱ्या शाईत केमिकल (Ink Chemical) असते आणि ते केमिकल धोकायदायक (Dangerous) असल्याचे समोर आले आहे.
वर्तमानपत्र प्रिंट करण्यासाठी डायआयब्युटाइल फटालेट (Diabutyl phthalate) आणि डायइन आयसोब्युटाईल (Dine isobutyl) या केमिकलचा वापर केला जातो.
हे आरोग्यासाठी (Health) अत्यंत धोकादायक असतात म्हणूनच पदार्थांमधील अतिरिक्त तेल शोषून घेण्यासाठी टीश्यू पेपर (Tissue paper) किंवा पेपर टॉवेलचा (Paper towel) वापर करण्यास सांगितले जाते.
ही शाई पोटात गेल्यास पचनक्रियेत (Digestion) बिघाड होऊ शकतो. वर्तमानपत्राच्या केमिकलमुळे अनेक पोटाचे विकारही होऊ शकतात. यामुळे अन्न आणि औषध प्रशासनाचे नवे आदेश जरी केले आहे.
वर्तमानपत्रात खाद्यपदार्थ देण्यास मनाई केली आहे. याचे पालन न केल्यास हॉटेलधारक (Hotelier), दुकानदार यांच्यावर कठोर कारवाई करण्याचे अन्न आणि औषध प्रशासनाने सांगोतले आहे.
भारतीय अन्न, सुरक्षा आणि मानक प्राधिकरण (Food, Safety and Standards Authority of India) यांनी अगोदरच धोक्याची सूचना दिली होती. त्यामुळे वर्तमानपत्रात खाद्यपदार्थ देण्यास बंदी घालण्यात आली आहे.