पुणे – गणेशोत्सव (rules for Ganeshotsav) अवघ्या एका दिवसावर आला आहे. या उत्सवात शहरात गणेशमूर्ती प्राणप्रतिष्ठा आणि विसर्जन मिरवणुकीत गणेशोत्सव मंडळांकडून अनेक मोठे कार्यक्रम सादर करण्यात येतात. गेल्या दोन वर्षापासून करोनामुळे (corona) विषाणूच्या संसर्गामुळे सर्वच सण आणि कार्यक्रम अतिशय साधेपणाने साजरा करण्यात आले आहे. मात्र, आता यंदाच्या वर्षी सर्व सण कोणत्याही निर्बंधांशिवाय उत्साहात साजरे करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

त्यामुळे सामान्य नागरिकांमध्ये उत्सवाचे वातावरण पाहायला मिळत आहे. त्यातच आपल्या सर्वांच्या जिवाभावाचा उत्सव म्हणजेच गणपतीचे आगमत होणार असून, सगळीकडे आनंद दिसून येत आहे.

नुकतीच, गणेशोत्सवाची नियमावलीही प्रशासनाकडून (Administration) जाहिर करण्यात आलीयं. पुणे शहरातील गणेश मंडळे कामालाही लागली आहेत.

अश्यातच एक महत्वाची बातमी समोर आली आहे. गणेशोत्सवाच्या या दहा दिवसांमध्ये गणेश मंडळांनी प्रसाद तयार करताना आणि वाटताना स्वच्छतेच्या नियमांचे काटेकोर पालन करावे,

असे निर्देश अन्न व औषध प्रशासनाने (Food and Drug Administration) दिले आहेत. वेळोवेळी प्रसादाच्या सेवनातून विषबाधा झाल्याच्या काही घटना यापूर्वी घडल्या आहेत. त्यामुळे हा निर्णय घेण्यात आला आहे.

काय आहे? नियम…

गणपती मंडळांनी स्वतः तयार केलेल्या प्रसादाचे वाटप करावे. प्रसादासाठी वापरला जाणारा शिधा व अन्न पदार्थांची गुणवत्ता तपासावी. प्रसाद करण्याच्या ठिकाणी स्वच्छता बाळगावी.

तयार प्रसाद थंड करण्यासाठी स्वच्छ जागेचा वापर केल्यास प्रसाद दूषित होण्याची शक्यता कमी होते. प्रसादात शक्यतो कोरड्या पदार्थांचा समावेश करावा.

गणेशोत्सवात विक्री केली जाणाऱ्या खवा, मिठाई, खाद्यतेलाच्या पदार्थावर अन्न व औषध प्रशासनाची नजर असणार आहे. भेसळयुक्त पदार्थ विकले जाऊ नयेत, म्हणून अन्न व औषध प्रशासना राबविणार विशेष मोहिम राबिवणार आहेत.

असे आदेश अन्न व औषध प्रशासनाने (Food and Drug Administration) काढले आहेत. त्यामुळे सर्व गणेश मंडळांना या आदेशाचे पालन करणे गरजेचे असणार आहे.