मुंबई : नितेश राणे (Nitesh Rane) यांना सिंधुदुर्ग सत्र न्यायालयानेही (Sindhudurg Sessions Court) दणका दिला आहे. नितेश राणे यांचा अटकपूर्व जामीन अर्ज सत्र न्यायालयाने फेटाळल्यानंतर निलेश राणे (Nilesh Rane) यांनी कोर्टासमोर हायव्होल्टेज ड्रामा केला होता.

हाच हायव्होल्टेज ड्रामा (High voltage drama) निलेश राणे यांच्या अंगलट आला आहे. सिंधुदुर्ग सत्र न्यायालयाने नितेश राणे यांचा अटकपूर्व जामीन फेटाळल्यानंतर (Pre-arrest bail) कोर्टाबाहेर निलेश राणे यांची पोलिसांबरोबर (Police) बाचाबाची केली होती.

आमची गाडी का अडवली? कोणत्या अधिकारात अडवली? तुमच्याकडे कोणती ऑर्डर आहे का? तुम्ही आम्हाला कायदा शिकवू नका?, आम्ही सर्वोच्च न्यायालयाचा कोणताही अवमान केला नाही असे म्हणत निलेश राणे यांनी पोलिसांशी हुज्जत घातली होती.

Advertisement

यावेळी तिथे उपस्थित असणाऱ्या राणे समर्थकांनी जोरदार घोषणाबाजी केली आणि पोलिसांच्या कामात अडथळा आणला. त्यामुळे कोर्टाबाहेर थोड्यावेळापुरते तणावाचे वातावरण निर्माण झाले होते.

या सर्व प्रकरणानंतर माजी खासदार निलेश राणे यांच्यावर गुन्हा (Crime) दाखल करण्यात आला आहे. यामुळे निलेश राणे यांना पोलिसांची हुज्जत घालणे चाललेच महागात पडल्याचे दिसत आहे.

Advertisement