मुंबई : भाजप आमदार नितेश राणे (Nitesh Rane) यांना अखेर पोलिसांकडून अटक (Arrest) करण्यात आली आहे. सिंधुदुर्ग सत्र न्यायालयाने (Sindhudurga District Court) नितेश राणे यांना २ दिवसांची पोलीस कोठडी (Police Custody) सुनावली आहे.

नगर पंचायत निवडणुकी वेळी संतोष परब (Santosh Parab Attack) हल्ल्याप्रकरणी सत्र न्यायालयाने नितेश राणे यांना २ दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे. त्यामुळे नितेश राणे यांना चांगलाच धक्का बसला आहे.

सत्र न्यायालयाने २ दिवसांची पोलीस कोठडी सुनावल्यानंतर कणकवली पोलीस (Kankavali Police) नितेश राणे यांना घेऊन पोलीस स्टेशनला गेले आहेत. २ दिवस नितेश राणे यांची चौकशी करण्यात येणार आहे.

Advertisement

नितेश राणे यांनी सुप्रीम कोर्टात अटकपूर्व (Pre-arrest bail) जामिनासाठी धाव घेतली होती. सुप्रीम कोर्टाने नितेश राणे यांना १० दिवस पोलीस अटकेपासून संरक्षण दिले होते. त्यामुळे पोलिसांना नितेश राणे यांना अटक करता येत नसल्याचे दिसत होते .

सुप्रीम कोर्टाने (Supreme Court) नितेश राणे यांना सत्र न्यायालयात अटकपूर्व जामीन अर्ज करण्यासाठी सल्ला दिला होता. त्यानुसार राणे यांनी सत्र न्यायालयात अटकपूर्व जामिनासाठी सत्र न्यायालयात अर्ज केला होता.

नितेश राणे यांनी सत्र न्यायालयात अटकपूर्व जामिनासाठी अर्ज केला होता तो सत्र न्यायालयाने फेटाळला होता. सत्र न्यायालयाने नितेश राणे यांना शरण येण्यासाठी सांगितले होते.

Advertisement

त्यानुसार नितेश राणे शरण आले होते. त्यांनतर सिंधुदुर्ग सत्र न्यायालयाने नितेश राणे यांना २ दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे. त्यानुसार पोलिसांनी नितेश राणे यांना अटक केली आहे.