कोल्हापूर : भाजप (BJP) नेते नितेश राणे (Nitesh Rane) यांनी जामीन (Bail) मंजूर झाल्यानंतर त्यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (CM Uddhav Thackeray) यांना प्रश्नावर प्रश्न करत हल्लबोल केला आहे. यात त्यांनी कुणाच्याही तब्येतीबद्दल प्रश्न विचारणे हे महाराष्ट्राच्या संस्कृतीला शोभतं का? असा सवाल ठाकरे सरकारला विचारला आहे.
नितेश राणेंची पोलीस कोठडी संपताच त्यांनी महाविकास आघाडी (Mahavikas Aghadi) वर हल्लाबोल केला आहे. यामध्ये त्यांनी आजारपणाबद्दल बोलताना त्यांनी उद्धव ठाकरे आणि महाविकास आघाडीतील नेत्यांच्या आजारपणाबद्दल प्रश्नाच्या फेऱ्या दाखवल्या आहेत.
नितेश राणे म्हणाले की, मला आजही जो त्रास होतोय, याच्याही नंतर कोल्हापूरच्या रुग्णालयातून डिस्चार्ज घेतला असला तरी मी एसएसपीएम रुग्णालयात दाखल होणार (Nitesh Rane Health) आहे. मनका, पाठीचा त्रास, शुगर लो होतेय, त्याचा मी इलाज करणार आहे.
परंतु माझ्या या आजाराला काहीजण राजकीय आजार आहे असे बोलत आहेत. पण आरोग्य व्यवस्थेने माझ्या टेस्ट केल्या आहेत. त्या काही खोट्या होत्या का? आत्त्ताच माझा बीपी चेक केला असून १५२ वर आहे, ते काय खोटं असेल काय?
कुणाच्याही तब्येतीबद्दल प्रश्न विचारणे हे महाराष्ट्राच्या संस्कृतीला शोभते का? असे अनेक सवाल राणेंनी यावेळी उपस्थित केले आहेत. तसेच राणे यांनी थेट मुख्यमंत्र्यांनाही थेट टार्गेट केले आहे.
ते म्हणाले की, प्रश्न आम्हीही विचारु शकतो, जेव्हा सरकार पडण्याची वेळ येते, तेव्हा मुख्यमंत्री गळ्यात बेल्ट का घालतात? लतादीदींच्या कार्यक्रमाला मुख्यमंत्री जातात, त्यावेळी कुठलाही बेल्ट नसतो.
अधिवेशनावेळी ते आजारी कसे पडतात? चौकशीच्या वेळीच महाविकास आघाडीतील नेत्यांना कोरोना कसा होतो? कुणाच्याही आरोग्याबद्दल असे प्रश्न विचारणे किती योग्य आहे? हे तपासणे गरजेचे आहे. राजकारणाचा स्तर किती खालावू शकतो, यावरही विचार करावा. असा हल्लाबोल राणेंनी यावेळी केला आहे.
त्याचसोबत राणे पुढे म्हणाले की आता मी आराम करणार आहे, दीड महिना मी मतदारसंघात गेलो नाही, गोव्याची जबाबदारी आहे, तिथेही गेलो नाही, तिथेही जाणार आहे. तब्येत सांभाळून मी कामला लागणार आहे.