सिंधुदुर्ग : शिवसैनिक संतोष परब (Santosh Parab Attack) हल्ल्याप्रकरणी भाजप (BJP) आमदार नितेश राणे (Nitesh Rane) यांचा सत्र न्यायालयाने अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळल्यानंतर राणे यांना पोलिसांकडून अटक करण्यात आली आहे.

जिल्हा न्यायालयात संतोष परब हल्ला प्रकरणी आज सुनावणी करण्यात आली आहे. या प्रकरणाचा युक्तिवाद संपला आहे, यामध्ये नितेश राणे यांना १८ फेब्रुवारीपर्यंत न्यायालयीन कोठडी (police Custody) सुनावण्यात आली आहे.

नितेश राणे यांच्या जमीन अर्जाचा मार्ग मात्र मोकळा झाला आहे. नितेश राणे सत्र न्यायालयात जामिनासाठी अर्ज करणार आहेत. सत्र न्यायालयाचा (Sessions Court) काय निर्णय येणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

Advertisement

सत्र न्यायालयाने नितेश राणे यांना २ दिवसांची पोलीस कोठडी सुनावली होती. २ दिवसांची पोलीस कोठडी संपल्यानंतर नितेश राणे यांना जिल्हा न्यायालयात हजार करण्यात आले होते.

नितेश राणीने यांना चौकशीसाठी पोलिसांनी गोव्यातही (GOA) नेले होते. या दोन दिवसात नितेश राणे यांची कसून चौकशी करण्यात आली. राकेश परब आणि नितेश राणे यांचीही पोलिसांकडून समोरासमोर चौकशी करण्यात आली आहे.

या चौकशी दरम्यान पोलिसांना अधिक माहिती मिळाल्याचे सांगण्यात येत आहे. सुनावणीवेळी सरकारी वकिलांनी पुण्याला (Pune) जाऊन तपास करावा लागेल असे मत कोर्टात मांडले होते. त्यासाठी नितेश राणेंची कोठडी आवश्यक आहे. असेही सांगण्यात आले होते.

Advertisement