सिंधुदुर्ग : भाजप (BJP) आमदार नितेश राणे (Nitesh Rane) यांचा सिंधुदुर्ग सत्र न्यायालयाने (Sindhudurg Sessions Court) अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळला आहे. त्यामुळे त्यांना चांगलाच झटका बसला आहे. नितेश राणे सत्र न्यायालयात शरण येणार असल्याची मोठी माहिती समोर येत आहे.

नितेश राणे यांचे वकील सतीश मानेशिंदे (Lawyer Satish Maneshinde) यांनी नितेश राणे कोर्टासमोर शरण येणार असल्याची माहिती दिली आहे.

तसेच नितेश राणे कोर्टासमोर शरण आल्यानंतर त्यांची कोठडी मागणार असल्याचे सरकारी वकील प्रदीप घरत (Public Prosecutor Pradeep Gharat) यांनी सांगितले आहे.

Advertisement

नितेश राणे यांनी सुप्रीम कोर्टात अटकपूर्व (Pre-arrest bail) जामिनासाठी धाव घेतली होती. सुप्रीम कोर्टाने नितेश राणे यांना १० दिवस पोलीस अटकेपासून संरक्षण दिले आहे.

सुप्रीम कोर्टाने (Supreme Court) नितेश राणे यांना सत्र न्यायालयात अटकपूर्व जामीन अर्ज करण्यासाठी सल्ला दिला होता. त्यानुसार राणे यांनी सत्र न्यायालयात अटकपूर्व जामिनासाठी सत्र न्यायालयात अर्ज केला होता.

नितेश राणे यांनी एक ट्विट (Twit) केले आहे. या ट्विटमध्ये त्यांनी अमित शहा आणि चिदंबरम यांचा वेगवेगळा फोटो शेअर करत समय बलवान है. इन्सान खामो खा गुरुर करता है असे वक्तव्य केले आहे.

Advertisement

Advertisement

नितेश राणे यांनी हे ट्विट नेमकं कुणासाठी केले आहे. याबाबत चर्चाना उधाण आले आहे. कोर्टाच्या निर्णयाचा आदर ठेवून मी कोर्टासमोर शरण यायला जातोय.

आजपर्यंत राज्य सरकारने वेगवेगळ्या पद्धतीने बेकायदेशीररित्या मला अटक करण्याचा प्रयत्न केला. अशी प्रतिक्रिया नितेश राणे यांनी दिली आहे.

Advertisement