सिंधुदुर्ग : भाजप आमदार नितेश राणे (Nitesh Rane) यांची २ दिवसांची पोलीस कोठडी (Police Custody) संपल्यानंतर न्यायालयाकडून त्यांना काहीसा दिलासा मिळाल्याचे चित्र दिसत आहे. नितेश राणे यांची तब्येत बिघडल्यानंतर शिवसेना (Shivsena MLA) आमदार वैभव नाईक (Vaibhav Naik) यांनी राणेंना खोचक टोला लगावला आहे.

भाजप (BJP MLA) आमदार नितेश राणे यांची २ दिवसांची पोलीस कोठडी संपल्यानंतर त्यांना १८ फेब्रुवारी पर्यंत न्यायालयीन कोठडी (Judicial Custody) सुनावण्यात आली आहे. त्यामुळे त्यांना काहीसा दिलासा मिळाला असल्याचे सांगण्यात येत आहे.

नितेश राणे यांची तब्येत बिघडल्याचे माहिती नितेश राणे यांच्या वकिलांनी दिली आहे. असेच नितेश राणे यांनी सावंतवाडी कारागृह (Sawantwadi Jail) अधीक्षकांकडे तब्येत बिघडल्याचे अर्ज दिला असल्याचीही माहिती वकिलांनी दिली आहे.

Advertisement

नितेश राणे यांची तब्येत बिघडल्यानंतर शिवसेना आमदार वैभव नाईक यांनी नितेश राणे यांना जोरदार टोला लगावला आहे.

आमदार वैभव नाईक म्हणाले की, पोलिसांचा तपास पूर्ण झाला असेल म्हणून त्यांना पोलीस कोठडी नंतर न्यायालयीन कोठडी मिळाली.

नितेश राणे यांची तब्येत दरवेळी बिघडत असते. तब्येत बिघडणे हा राजकीय आजार आहे की खराखुरा आजार आहे हे डॉक्टर ठरवतील. त्यांची तब्येत बिघडू नये म्हणून शुभेच्छा, असा चिमटा वैभव नाईक यांनी नितेश राणे यांना काढला आहे.

Advertisement

नितेश राणे यांच्या वकिलांनीही प्रतिक्रिया दिली आहे. ते म्हणाले, नितेश राणे यांची प्रकृती आधीपासूनच बरी नव्हती. तरीही कोर्टाच्या आदेशानुसार ते पोलीस कोठडीत गेले होते.

पण आता जसे रेग्युलर चेकअप होईल, डॉक्टरांना जे काही आढळून येईल त्यानुसार पुढील कारवाई होईल असे राणेंचे वकील म्हणाले आहेत.

Advertisement