मुंबई : नितेश राणे (Nitesh Rane) यांना सिंधुदुर्ग सत्र न्यायालयानेही (Sindhudurg Sessions Court) दणका दिला आहे. नितेश राणे यांचा अटकपूर्व जामीन अर्ज सत्र न्यायालयाने फेटाळल्यानंतर निलेश राणे (Nilesh Rane) यांनी कोर्टासमोर हायव्होल्टेज ड्रामा केल्याचे पाहायला मिळाले.

माजी खासदार निलेश राणे जमीन अर्ज फेटाळल्यानंतर चांगलेच आक्रमक झाल्याचे पाहायला मिळाले. त्यामुळे थोड्यावेळापुरते का होईना कोर्टाबाहेरचे वातावरण चांगलेच तबल्याचे पाहायला मिळाले.

पोलीस (Police) आणि निलेश राणे यांच्यामध्ये बाचाबाची झाली. निलेश राणेंनी मला कायदा शिकवू नका अशी प्रतिक्रिया दिली आहे. पोलिसांनी गाडी थांबवल्यामुळे निलेश राणे यांना चांगलाच राग आल्याचे पाहायला मिळाले.

Advertisement

सिंधुदुर्ग सत्र न्यायालयाने नितेश राणे यांचा अटकपूर्व जामीन नाकारला आहे. त्यामुळे राणे यांना अटक होण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. नितेश राणेंच्या अडचणीत वाढ होताना दिसत आहे.

नितेश राणे यांनी सुप्रीम कोर्टात अटकपूर्व (Pre-arrest bail) जामिनासाठी धाव घेतली होती. सुप्रीम कोर्टाने नितेश राणे यांना १० दिवस पोलीस अटकेपासून संरक्षण दिले आहे. त्यामुळे पोलिसांना अजूनही नितेश राणे यांना अटक करता येणार नसल्याचे सांगितले जात आहे.

सुप्रीम कोर्टाने (Supreme Court) नितेश राणे यांना सत्र न्यायालयात अटकपूर्व जामीन अर्ज करण्यासाठी सल्ला दिला होता. त्यानुसार राणे यांनी सत्र न्यायालयात अटकपूर्व जामिनासाठी सत्र न्यायालयात अर्ज केला होता.

Advertisement

या अटकपूर्व जमीन अर्जावर सोमवारी दोन्ही बाजूनी सत्र न्यायालयात युक्तिवाद करण्यात आला. हा युक्तिवाद तब्बल साडेपाच तास चालला होता. मंगळवारी निकाल देण्यात येईल असे न्यामूर्तनी सांगितले होते.

त्यानुसार आज सिंधुदुर्ग सत्र न्यायालयाने आज निकाल दिला आहे. यामध्ये नितेश राणे यांचा अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळण्यात आला आहे. त्यामुळे नितेश राणेंच्या अटकेची शक्यता वाढली आहे.

Advertisement