सिंधुदुर्ग : शिवसैनिक संतोष परब (Santosh Parab Attack) हल्ल्याप्रकरणी भाजप (BJP) आमदार नितेश राणे (Nitesh Rane) यांचा सत्र न्यायालयाने अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळल्यानंतर राणे यांना पोलिसांकडून अटक करण्यात आली आहे.

जिल्हा न्यायालयात संतोष परब हल्ला प्रकरणी आज सुनावणी करण्यात आली आहे. या प्रकरणाचा युक्तिवाद संपला असून कोणत्याही क्षणी कोर्टाचा निकाल येण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.

सुनावणीवेळी सरकारी वकिलांनी पुण्याला (Pune) जाऊन तपास करावा लागेल असे मत कोर्टात मांडले आहे. त्यासाठी नितेश राणेंची कोठडी आवश्यक आहे. असेही सांगण्यात आले आहे.

Advertisement

पोलिसांचा नितेश राणेंची कोठडी मिळवण्यावर जोर असल्याचे दिसून आले आहे. त्यामुळे कोर्टाचा निकाल काय येणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. नितेश राणे यांची पोलीस कोठडी आणखी वाढणार का सुटका होणार हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.

भाजप आमदार नितेश राणे यांची आज पोलीस कोठडी संपणार आहे. त्यामुळे त्यांना न्यायालयात हजर करण्यात आले आहे. न्यायालयाचा निकाल काय येणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

नितेश राणे यांचा अटकपूर्व जामीन अर्ज (Pre-arrest bail) सत्र न्यायालयाने फेटाळल्यानंतर नितेश राणे कोर्टचा मान राखत शरण आले होते. त्यानंतर त्यांना कणकवली पोलिसांनी अटक केली होती.

Advertisement