कोल्हापूर : भाजपचे (BJP) नेते नितेश राणे (Nitesh Rane) यांना न्यायालयाने १८ फेब्रुवारी पर्यंत न्यायालयीन कोठडी (Judicial Custody) सुनावली आहे. नितेश राणे यांची तब्येत बिघडल्यामुळे त्यांना कोल्हापूरला (Kolhapur) नेण्यात आले होते.

यापूर्वी त्यांनी छातीत दुखत असल्याची तक्रार केली होती त्यांनतर त्यांना तातडीने कोल्हापूरच्या रुग्णालयात (Kolhapur Hospital) दाखल करण्यात आले होते. पण मध्यरात्री पासून नितेश राणे यांना उलट्यांचा त्रास सुरु झाला आहे.

नितेश राणे यांना मध्यरात्रीपासून ३ वेळा उलट्यांचा त्रास झाल्यामुळे त्यांच्यावर तातडीने उपचार सुरु करण्यात आले आहेत. हा त्रास त्यांना कशामुळे होत आहे. अद्याप स्पष्ट झाले नाही.

Advertisement

शरीरातील अशक्तपणामुळे त्यांना हा उलट्यांचा त्रास झाला असण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. ओरोसवरून (Oros) नितेश राणे यांना सोमवारी कोल्हापूरच्या सीपीआर रुग्णालयात (CPR Hospital) दाखल करण्यात आले आहे.

रुग्णालयातील हृदयरोग विभागात नितेश राणेंवर उपचार सुरू होते. त्यांच्यावर उपचार करण्यासाठी डॉक्टरांचे एक पथक नेमण्यात आले आहे. काल त्यांच्या काही टेस्ट करण्यात येणार होत्या. परंतु, त्या झाल्या नाहीत. आज या वैद्यकीय टेस्ट होणार होत्या.

पण नितेश राणे यांना रात्री अचानक उलट्यांचा त्रास सुरु झाल्यामुळे या टेस्ट रद्द करण्यात आल्या आहेत. नितेश राणे यांना अशक्तपणामुळे नीट चालताही येत नसल्याची माहिती मिळत आहे.

Advertisement